गांधी व सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी, असंही म्हटलं आहे..
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप नेते विनोद तावडे यांना विरार पूर्व मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये गाठून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पैसे वाटत असल्याच्या आरोपानंतर, राजकीय खळबळ माजली आहे. महाविकास आघाडीने हा मुद्दा उचलून भाजपवर टीका सुरू केली आहे. तर विनोद तावेड यांनीही विरोधकांना सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची आणि निवडणूक आयोगाकडून चौकशी करण्याचे आव्हान दिलं आहे.
विरार पूर्व मनवेलपाडा येथील विवांत हॉटलमध्ये विनोद तावडेंच्या उपस्थितीत भाजप उमेदवार राजन नाईक आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांममध्ये मोठा वाद झाला. विशेष म्हणजे मतदानाला अवघे काही तासच शिल्लक असताना बविआकडून विनोद तावडे हे या ठिकाणी पाच कोटी रुपये वाटपासाठी आल्याचा आरोप केला गेला, शिवाय काही नोटांची बंडलं दाखवली गेली ज्यामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला.
G-20 summit : G-20 शिखर परिषदेत मोदी म्हणाले – ‘ग्लोबल साउथचा आवाज बुलंद करावा लागेल’
भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे वसई येथील घटनेबाबत निवेदन जारी केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला. हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली.
तसेच, ‘हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. राहुल गांधी व सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी.’ असंही विनोद तावडे म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App