विलासरावांचे दोन्ही सुपुत्र आमदार राहुलजींच्या भारत जोडो यात्रेपासून दूर; राजकीय वर्तुळात कुजबुज

प्रतिनिधी

मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मोठा गाजावाजा केला जात असताना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे दोन्ही सुपुत्र आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख आणि या यात्रेकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात ‘वेगळीच’ कुजबुज सुरू झाली आहे. Vilasrao’s two sons are away from MLA Rahulji’s Bharat Jodo Yatra

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यामध्ये मध्ये दाखल होऊन तीन दिवस उलटले. काॅंग्रेसचे नेते आणि पदाधिकारी त्यात सहभागी झाले आहेत. परंतु, नांदेडच्या शेजारीच असलेल्या लातूर जिल्ह्यातील काॅंग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख, त्यांचे आमदार बंधु धीरज देशमुख अद्याप भारत जोडो कडे फिरकलेले नाहीत. किंबहुना लातूरमधील काँग्रेसचे कार्यकर्तेही या यात्रेत सहभागी झालेले दिसले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.



राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. पण मग खुद्द काँग्रेसचे आमदार असलेले विलासरावांचे दोन सुपुत्र का उपस्थित नाहीत?, असा सवाल विचारला जात आहे.

देशमुख बंधूंच्या या भूमिकेची कुजबुज नांदेडपासून थेट मंत्रालयापर्यंत सुरू आहे. चव्हाण- देशमुख यांच्यातील अंतर्गत वाद आणि संघर्षाची किनार या अनुपस्थितीला नाही ना, असाही सवाल उपस्थित होत आहे. नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेवर अशोक चव्हाण यांचा प्रभाव दिसत असल्यामुळे देशमुखांनी तेथे जाणे टाळल्याचीही चर्चा आहे.

बेबनाव वेगळ्या संकेतांचा दर्शक? 

हिंगोली जिल्ह्यात जेव्हा यात्रा पोहचेल, तेव्हा तेथे दोन्ही देशमुख हजेरी लावणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. मात्र, काँग्रेस पक्ष एकीकडे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असताना, स्वपक्षीयांमधला बेबनाव वेगळेच संकेत देत असल्याची चर्चा आहे.

Vilasrao’s two sons are away from MLA Rahulji’s Bharat Jodo Yatra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात