विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रेक्षकांनी स्वतःचा चॉईस तपासून पहावा, निश्चित करा, त्याच्यावर बंधने घाला आणि भिकार सिरीयल पाहणे बंद करा, तुमचा वेळ वाया घालवू नका, असे आवाहन अभिनेते विक्रम गोखले यांनी केले. Vikram Gokhale appeals to viewers to stop watching useless serials; Advice to check the choice
कल्याण येथील सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत आणि चांगल्याच्या मागे लागतील , म्हणजे मग चांगले दिग्दर्शक, नट, लेखक येतील. म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक ,सिरीयल नक्की पहा असे आवाहन राज्यभरातील प्रेक्षकांना विक्रम गोखले यांनी केले.
विक्रम गोखले यांनी प्रेक्षकाशी ऑनलाईन संवाद साधला. प्रसार माध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली. डीजीटायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकाच्या माथी मारले जात आहे.आज प्रसार माध्यमे पैशाच्या मागे धावत असल्याने चांगल्याचा त्यांना विसर पडल्याचे गोखले यांनी सांगितले.
आज कोणताही अर्थ नसलेल्या सिरीयल घाल पाणी- घाल पीठ या न्यायाने प्रेक्षकाच्या माथी मारल्या जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोरोना काळाचे वर्णन करणारी शॉर्ट फिल्म दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तयार केली असून सत्यावर आधारित आहे. अशी कलाकृती निर्माण केल्याबद्दल गोखले यांनी त्यांचे कौतुक करत आपल्याला त्याच्याबरोबर काम करायला आवडेल असे सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App