विशेष प्रतिनिधी
मुंबई :Vikhe Patil राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत त्यानुसार जीआर देखील काढण्यात आला आहे. परंतु, या जीआरचा टाचणी एवढाही फायदा किंवा उपयोग होणार नसून समाजाला यातून काहीही मिळणार नसल्याची टीका मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. यावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच यावेळी बोलताना विखे पाटलांनी विनोद पाटलांवर टीका देखील केली आहे.Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मराठा समाजातील लोकांनी मतभेद व्यक्त केले आहेत. आरक्षणाचा संघर्ष मजबूत होण्यापेक्षा दरीत गेला. आता सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. पुढे कसे जाईल हे बघितले पाहिजे. हे मिळाले नाही ते मिळाले नाही. वेगवेगळे मतप्रवाह निर्माण करुन काय मिळणार? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच आरक्षणावर चर्चा सुरु होती तेव्हा विनोद पाटील ताजमध्ये झोपले होते, अशी टीका देखील विखे पाटलांनी केली आहे.Vikhe Patil
पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आरक्षणाचा 16 टक्क्यांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकला होता. मात्र, महाविकास आघाडीने ते टिकवले नाही. लोकांनी त्यांना उघडे पाडायला पाहिजे होते. मात्र, असे घडलेले दिसत नाही. पुन्हा महायुती आल्याने 10 टक्के आरक्षण दिले आणि अजूनही ते आरक्षण टिकून आहे. तसेच विचारवंतांनी आता शांत बसावे, अंमलबजावणी करण्यात मदत करावी, असाही विखे पाटलांनी टोला लगावला आहे.Vikhe Patil
लक्ष्मण हाकेंच्या टीकेवर प्रतिक्रिया
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय मिळवा अशी सरकारची भूमिका आहे. तसेच लक्ष्मण हाके यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले, मागे पण मी त्यांना सांगितले होते की तुम्ही अन्य समाजाच्या आरक्षणात का लुडबूड करत आहात. तुमच्या राजकीय पोळ्या का भाजून घेत आहात तुम्ही? त्यांना त्यांचे आरक्षण मिळत आहे, तुमचे आरक्षण कोणीही काढून घेत नाही.
काय म्हणाले होते विनोद पाटील?
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनानंतर, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा लाभ देण्यासाठी एक शासन निर्णय जारी केला. मात्र, मराठा आरक्षण याचिकाकर्ते आणि कार्यकर्ते विनोद पाटील यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. विनोद पाटील यांच्या मते, हा शासन निर्णय नसून, केवळ एक माहिती पुस्तिका आहे. त्यामुळे, या जीआरमुळे मराठा समाजाला कोणताही फायदा होणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना विनोद पाटील म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना सरकारने जो कागद दिला आहे, त्याला जीआर म्हणता येणार नाही. हे नेमके काय आहे? एखाद्या गोष्टीची माहिती अशा पद्धतीने कारण करण्यात यावी, अशी माहिती या कागदामध्ये असल्याचे विनोद पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App