– आज नाशिक मध्ये भव्य सन्मान सोहळा!!
विशेष प्रतिनिधी
नाशिक : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर ६ ते ९ फेब्रुवारी अशा ४ दिवसांच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत असून त्यांच्या या दौऱ्यात महिलाविषयक कायद्यांच्या संदर्भात बैठकांचा सिलसिला असणार आहे. यामध्ये “पॉश” कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातली आढावा बैठक महत्त्वाची असून त्याचबरोबर विविध महिला संघटनांच्या भेटीगाठी आणि त्यांच्याशी विचार विनिमय हा महत्त्वाचा भाग या दौऱ्यात असणार आहे.
गोदातटीच्या माहेरवाशीणीचा गौरव करण्याची अप्रतिम संधी नाशिककरांना मिळणार आहे. विजयाताईंचा नाशिकमध्ये आज (गुरुवारी) भव्य सत्कार सोहळा आयोजित केला आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विजयाताईंचा सत्कार होणार आहे.
तत्पूर्वी दुपारी ३.०० ते ४.३० या वेळेत विजयाताई महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला भेट देणार आहेत. सायंकाळी ५.०० वाजता गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये नाशिक मध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांशी त्या विशेष बैठकीत संवाद साधणार आहेत. याच गुरुदक्षिणा हॉलमध्ये विजयाताईंचा भव्य सत्कार सोहळा त्यानंतर आयोजित करण्यात आला आहे.
७ तारखेला विजयाताई सकाळी नाशिक सेंट्रल जेलला भेट देणार असून त्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये जिल्हा आणि तालुका स्तरावरच्या बैठका आयोजित केल्या आहे. त्यातली प्रमुख बैठक “पॉश” कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातल्या आढाव्याची असणार आहे.
७ तारखेलाच सायंकाळी ६.०० वाजता गोदावरी सेवा समितीचा पुरस्कार सोहळा अहिल्यादेवी होळकर घाट रामतीर्थावर होणार असून राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते जलतज्ञ महेश शर्मा यांना गोदा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला विजयाताईंची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
८ आणि ९ या दोन तारखांना विजयाताईंनी छत्रपती संभाजी नगर मध्ये विविध एनजीओज आणि महिला संघटनांबरोबर बैठका आयोजित केल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App