– गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार सन्मान सोहळा Vijaya Rahatkar
विशेष प्रतिनिधी
नाशिक : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शून्यातून समाजसेवेचा आणि स्त्री सेवेचा भव्य दिव्य असा संसार थाटणाऱ्या माहेरवाशीण सौ. विजयाताई रहाटकर यांचा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये आज गुरुवार दि.६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नागरी सन्मान सोहळा होणार आहे, अशी माहिती रामतीर्थ गोदावरी सेवा समिती व स्वागत समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजयाताई रहाटकर यांचा आजवरचा प्रवास अतिशय संघर्षमय राहिलेला आहे. त्यांनी अथक परिश्रमातून कार्यकर्ता, नगरसेवक, महापौर, भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रीय सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, दीव दमण, राजस्थान प्रभारी ते राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष असा त्यांचा आजवरचा जीवन प्रवास राहिला आहे. यांचा हा अथक प्रवास समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी असा आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी रामतीर्थ गोदावरी सेवा समिती व स्वागत समितीच्या वतीने त्यांचा नागरिक सन्मान करण्यात येत आहे.
या नागरी सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने विजयाताई रहाटकर यांच्या हस्ते समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी महिला सत्कार होणार आहे. यामध्ये परिवहन, क्रीडा,कला, सामाजिक सेवा,योग आणि आरोग्य, शिक्षण, व्यावसायिक, डॉक्टर्स, आरोग्यसेवा, प्रभावशाली महिला व्यक्तीमत्व, उद्योग, व्यवसाय, आध्यात्मिक, गोदा आरती आणि संस्कृती श्रेणीतील नवदुर्गांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या नवदुर्गांच्या सन्मानाची संकल्पना संकल्पना कविता देवी, दिलीप दीक्षित, दिपक भगत, प्रेरणा बेळे, अंजली वेखंडे, आशिमा केला, समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, सचिव मुकुंद खोचे, उपाध्यक्ष शांताराम भानोसे, नरसिंह कृपा प्रभु, चिराग पाटील, शैलेश देवी, धनंजय बेळे, शिवाजी बोनदार्डे, रंजितसिंह आनंद, वैभव क्षेमकल्याणी, दिनेश बर्डेकर, राजेंद्र फड, स्वागत समिती अध्यक्ष श्रीनिवास लोया, रामेश्वर मालानी, नरेंद्र कुलकर्णी, गुणवंत मणियार, विनीत पिंगळे यांची आहे.
या सोहळ्यास स्वागत समिती अध्यक्ष निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, (कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठ), नयना गुंडे, उपाध्यक्ष तथा आदिवासी विकास आयुक्त, डॉ. दीप्ती देशपांडे, कार्यवाहक तथा गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव, कविता देवी, आर्थिक सल्लागार हे उपस्थित राहणार असून सन्माननीय उपस्थिती मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शबरी विकास महामंडळाच्या एमडी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांची असणार आहे.
या नागरी सन्मान सोहळ्यास नाशिक शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रामतीर्थ गोदावरी सेवा समिती व स्वागत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App