विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचे पक्के “शरद पवार” आणि “आर आर आबा पाटील” झाले आणि त्यांनी या दोघांएवढेच बेजबाबदार वक्तव्य केले.
मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर. आर. आबा पाटलांनी “ऐसे छोटे-छोटे हादसे होते रहते है”, असे बेजबाबदार वक्तव्य केले होते. पण त्यामुळे त्यांना आपले पद गमवावे लागले होते. पहलगाम आल्यानंतर शरद पवारांनी दहशतवाद्यांच्या धर्माची चर्चा नको, असे वक्तव्य करून हिंदू हत्याकांडाचे सत्य नाकारले.
त्यापलीकडे जाऊन विजय वडेट्टीवार यांनी आपली राजकीय अक्कल पाजळली. पहलगाम हल्ल्याचा ठपका मोदी सरकार वरच ठेवताना त्यांनी चक्क दहशतवाद्यांची भलामण केली. लोकांना धर्म विचारून गोळ्या घालायला दहशतवाद्यांकडे वेळ तरी होता का??, असे बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केले. दहशतवादी 200 किलोमीटर भारताच्या हद्दीत आले त्यांनी पहलगाम मध्ये 27 लोकांना मारले. त्यावेळी तुमचा इंटेलिजन्स ब्युरो आणि बाकीचे गुप्तहेर यंत्रणा काय करत होती??, असा सवाल त्यांनी मोदी सरकारला केला.
#WATCH | Nagpur, Maharashtra | Congress MLA Vijay Wadettiwar says, "The government should take responsibility for the #PahalgamTerroristAttack. They (the government) are saying that terrorists killed people after asking them (about their religion). Do terrorists have time for all… pic.twitter.com/88ic7AM5gf — ANI (@ANI) April 28, 2025
#WATCH | Nagpur, Maharashtra | Congress MLA Vijay Wadettiwar says, "The government should take responsibility for the #PahalgamTerroristAttack. They (the government) are saying that terrorists killed people after asking them (about their religion). Do terrorists have time for all… pic.twitter.com/88ic7AM5gf
— ANI (@ANI) April 28, 2025
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाकिस्तानशी युद्ध नको अशी भूमिका मांडल्याचे त्यांनी समर्थन केले. पण पण दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या घातल्या हे सत्य वडेट्टीवार यांनी नाकारले. पण ते नाकारताना दहशतवाद्यांना धर्म विचारायला वेळ तरी होता का??, असा अचरट सवाल करून आपली राजकीय अक्कल पाजळली.
आर आर आबा पाटलांनी बे जबाबदार वक्तव्य केल्यामुळे त्यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. पण आता वडेट्टीवार यांच्याकडे कुठले पदच नाही. कारण तेवढी त्यांच्या पक्षाची राजकीय लायकीच शिल्लक उरली नाही. त्यामुळे त्यांना काय गमवावे लागणार किंवा त्यांच्याकडे राजीनामा कसला मागणार??, असा सवाल समोर आला. पण वडेट्टीवार यांचे वक्तव्य मूर्खपणाचे आणि शत्रूला पाठबळ देणारे असल्याचे वाभाडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App