विशेष प्रतिनिधी
नागपूर : Vijay Wadettiwar ओबीसी समाजावर लढो या मरो-ची परिस्थिती आली आहे. आतापर्यंत ओबीसींच्या 7 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील ओबीसी समाजामध्ये प्रचंड संताप आहे. दोन समाज आमने-सामने आले आहेत. मराठवाड्यात तर अनेक गावांमध्ये मराठा-ओबीसी वाद सुरू आहे हे सर्व सरकारचे पाप आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे ओबीसीसाठी आशेचा किरण आहे असे छगन भुजबळ म्हणत आहेत, तर तो आशेचा किरण कधी प्रकाशात होईल.नुसते बोलून काय फायदा. आशेचा किरण काढलेला जी आर का रद्द करत नाही. भुजबळ साहेब बाहेर का बोलत आहेत. मंत्रिमंडळात बोलून तो जी आर कसा ओबीसीच्या जीवावर आहे हे सांगत का नाहीत, भुजबळांनी जी आर रद्द करुण घ्यावा, मग आम्ही समजू की आशेचा किरण मजबूत आहे म्हणून. आम्हाला आशेचा किरण नको न्यायाचा किरण हवा आहे.Vijay Wadettiwar
..तर संपूर्ण समाज उपाशी राहील
विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी संघटनेच्या सर्व नेत्यांना घेऊन आम्ही विदर्भाचा दौरा करणार आहोत. मुळात किती लोक येतील यापेक्षा ओबीसीचा आक्रोश मोठा आहे. हा जी आर काढून ओबीसींचे मोठे नुकसान केले आहे हे समाजाला कळून चुकले आहे. हैदराबाद गॅझेट च्या नुसार कुणीही मराठा शिल्लक राहणार नाही ते सर्व ओबीसी समाजामध्ये येईल. मोठा समाज ओबीसीमध्ये आल्याने ओबीसींच्या हक्का मध्ये शिरकाव आहे. हा समाज जर ओबीसीमध्ये आला तर कुठेही हा समाज दिसणार नाही. खाणारी दोन तोंड उपाशी असताना 4 जण अजून आले तर सर्वच जण उपाशी राहतील. मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जी आर ला कुठलाही संवैधानिक अधिकार नाही, कॅबिनेटच्या बैठका नाही, तरी पण जी आरच्या माध्यमातून पूर्णत:ओबीसीमध्ये घालण्याचा प्रयत्न नाही तर अधिकारच राज्य सरकारने मराठा समाजाला दिला आहे, हे यामध्ये लपून राहिलेले नाही.
यंत्रणा पूर्णत: दबावामध्ये
विजय वडेट्टीवार म्हणाले की, हा मोठा समाज जर ओबीसीमध्ये आला तर गरीब ओबीसी समाजाचे काय? अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये ओबीसी समाज जगतो आहे. सरकारने जर एखादा सर्वे केला तर त्यांना हे दिसून येईल. आरक्षण हे शैक्षणिक, सामाजिक आणि मागासलेपणा वरती दिलेले आहे. पण त्याच कुठेही ताळमेळ दिसून येत नसताना हा जी आर काढत मुख्यमंत्र्यांनी सांगायचे की ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि त्यानंतर इतक्या लोकांना ओबीसीमध्ये घुसवायचे. आज सरसकट पुरावे वाटले जात आहे. फार मोठ्या प्रमाणात पुरावे वाटले जात आहेत. नको त्या माणसांना पुरावे दिले जात आहे. खालची यंत्रणा पूर्णत: एकदम दबावामध्ये येत प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू केले आहे.
श्वेतपत्रिका काढा
विजय वडेट्टीवार म्हणाले की, श्वेतपत्रिका काढत किती मराठा समाज बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र दिले याची माहिती देण्याची मागणी आम्ही केली आहे. अनेक मराठा समाज बांधवांचा आणि नेत्यांचा विरोध असताना कुणाच्या दबावामुळे हे होत आहे हे ओबीसी बांधवांना कळून चूकले आहे. मायक्रो ओबीसी आता कुठेच राजकीय स्पर्धेत टिकणार नाही. त्यांचे राजकीय आणि शैक्षणिक आरक्षण संपवून टाकत आहात. ओबींसींची आर्थिक स्थिती तर कमजोर आहेच. महा जी आर रद्द करण्याची आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत असे वडेट्टीवारांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App