विशेष प्रतिनिधी
नागपूर : Vijay Wadettiwar मराठा समाजाच्या आरक्षणावरून आता ओबीसी नेत्यांची आपसातच जुंपली आहे. मराठ्यांना ओबीसी समाजाच्या कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी सर्वच ओबीसी नेत्यांचे एकमत आहे. असे असले तरी दुसरीकडे ते एकमेकांना टार्गेटही करीत आहेत. शुक्रवारी बीड येथे झालेल्या ओबीसीच्या मोर्चात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवारांचा एक जुना व्हीडीओ दाखवला. त्याला शनिवारी पत्रकार परिषदेतून वडेट्टीवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार म्हणाले की, भुजबळ सध्या फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्यांच्या फॅक्टरीत काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना मालकाचे गुणगान गावेच लागते असा टोला त्यांनी लगावला.महायुती सरकारने हैद्राबाद गॅझेटमध्ये मराठा-कुणबी अशी असलेल्यांना असलेल्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र जी आर काढला आहे. या जी आरमुळे मराठ्यांची ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी सुरू झाली आहे. हा जी आर रद्द करावा ओबीसी बांधवांचा मोर्चा काढला होता. त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे मला टार्गेट करण्यासाठी भाजपने भुजबळांना सोडले आहेVijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार म्हणाले की, भुजबळांनी दाखवलेल्या व्हिडिओबद्दल माझी भूमिका ओबीसी मोर्चातच भूमिका स्पष्ट केली आहे. तेव्हा मी विरोधी पक्षनेता होता. जरांगे उपोषणाला बसले होते. तेव्हा मराठवाड्यात मराठा-कुणबी अशा फक्त 2800 नोंदी होत्या. त्यामुळे जी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता.याला माझा आजही विरोध नाही. मात्र नव्या जीआरचा माध्यमातून हजारो मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवल्या जात आहे. रोज हजार जात प्रमाणपत्र वितरित केले जात आहे. त्यामुळे माझा या जीआरला विरोध आहे. त्यामुळे मी ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. त्यातून मराठ्यांना आरक्षण द्यावे असे मत मांडले होते. मात्रा माझा व्हीडीओ कट केला. तो अर्धवट दाखवून ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात आहे. संभ्रम निर्माण केला जात असल्याचे वडेट्टीवारांनी स्पष्ट केले.भुजबळ ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी आरक्षणावर त्यांची आणि माझी भूमिका एकच आहे. मी त्यांना कधीच क्रॉस केले नाही. त्यांच्या भूमिकेवर शंकासुद्धा घेतली नाही. आमची मूळ मागणी मराठ्यांना कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देण्यासाठी काढण्यात आलेला जी आर रद्द करा ही आहे. ते महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी विरोध केला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. मात्र ते मला का टार्गेट करीत आहेत हे कळत नाही. फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्यांनी भुजबळ व जरांगेंना माझ्या अंगावर सोडल्याचे दिसते. भुजबळ आणि जरांगे दोघेही मला टार्गेट करीत असतील आणि शिव्या देत असतील तर आनंदच आहे. समाजासमाजात आणि आपसात भांडणे लावणे हा भाजपचा धंदाच असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App