Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांचा सवाल- गुलाल उधळला होता, तर जरांगे पुन्हा मुंबईत का आले? ओबीसींचे आरक्षण वाढवा!

Vijay Wadettiwar

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Vijay Wadettiwar मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट पवार कुटुंबावर आरोप करत त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवण्याचे काम केल्याचा आरोप केला आहे. तसेच आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे.Vijay Wadettiwar

हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशीच आमची भूमिका आहेच आहे, मात्र त्याचसोबत ओबीसींचे जे आरक्षण आहे त्यात देखील वाढ झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांची आधीची भूमिका काय होती आणि आता काय आहे यावर पुढे बोलणे अधिक उचित ठरेल.Vijay Wadettiwar

मतांचा फायदा उपटण्याचे काम महायुती सरकार करत आहे- विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार यांना ओबीसींचे नुकसान झाले का, असा प्रश्न विचारला असता, त्यावर ते म्हणाले, कालचा जीआर पाहिला अनेकांशी माझी चर्चा सुरू आहे, त्या जीआरच्या संदर्भातील स्पष्टता आणण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक आम्ही 6 तारखेला बोलावली आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांची बैठक 8 तारखेला बोलावली आहे. या जीआर नुसार ओबीसीला काय झळ पोहोचली आहे, काय नुकसान झाले आहे, यासाठी काही तज्ञ लोकांना देखील पाचारण केले आहे. मुळात ओबीसी आणि मराठा हा विषय जो गाजत आहे, यात मुळात ज्या पक्षाची भूमिका ही आरक्षण विरोधी आहे ते कोणाचे भले करतील? निवडणूक आली की समाजाला खेळवायचे आणि मतांचा फायदा उपटण्याचे काम महायुती सरकार करत आहे. मुळात ज्या वेळी मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईपर्यंत आला आणि नंतर गुलाल उधळण्यात आला, तर पुन्हा जरांगे यांना का मुंबईत यावे लागले? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.Vijay Wadettiwar



दोन्ही समाजाला खेळवत भाजपने ठेवले

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, ओबीसीचे नुकसान होते की नाही, तर त्या 58 लाख नोंदी ज्या काही सापडल्या होत्या त्यातील 96 हजारांना लोकांना जात प्रमाणपत्र देण्यात आली असली तरी व्हॅलिडीटीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. मराठा आणि कुणबी या दोन जाती वेगळ्या आहेत हे सुप्रीम कोर्टाने आणि उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. असे असताना सुद्धा जर त्या जीआरमधून हैदराबाद गॅझेटचा संदर्भ देऊन तो जीआर काढला असेल. हा जीआर आहे, याची कॅबिनेट बैठकीत चर्चा घेऊन अंतिम मसुदा काय येतो आणि सातारा गॅझेट संदर्भात असा काही उल्लेख नाही. त्यामुळे यामुळे भाजपची भूमिका दोन्हीही समाजाची मते मिळवण्यासाठी दोघांनाही खेळवत ठेवायचे आणि फिरवत ठेवायचे आणि आपली पोळी शेकायची हाच अर्थ या जीआरचा निघत आहे. अनेक राज्यांनी ओबीसींचे आरक्षण वाढवले आहे.

मी मारल्या सारखे करतो तो रडल्यासारखे कर, असा प्रकार सुरू

ओबीसी आणि मराठ्यांची बनवाबनवी करून तोंडाला पाने पुसणे सुरू आहे. काय ओबीसीचे भले झाले? कॉंग्रेसची सरकार असताना ओपन टु ऑल ओपन असा जीआर होता. जे आरक्षणमध्ये आहेत त्यांना ओपनमध्ये सुद्धा संधी होती. ही संधी मोदी सरकारने जीआर काढून घालवली. 80 टक्के लोकांना 52 टक्के आरक्षण देत आहेत. त्यामुळे शासकीय नोकऱ्यांमध्ये 20 टक्के लोकांना 80 टक्के नोकऱ्या मिळत आहेत. ही बाब ओबीसी बांधवांनी समजून घेतला पाहिजे. ओबीसी समाजाला खड्ड्यात घालण्याचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे मी मारल्या सारखे करतो तो रडल्यासारखे कर, मी गुदगुल्या करतो तू हसल्यासारखे कर असा प्रकार सुरू आहे का, हे आज सांगणे घाईचे होईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

या जीआरमुळे मराठा समाजाला काही मिळणार नाही

शिंदे समिती नेमून दोन वर्षे झाली, शिंदे समितीला दोन वर्षांचा काळ का लागला? कुठल्याही निष्कर्षांपर्यंत शिंदे समिती गेली नाही. याचा अर्थ मराठा समाजाची फसवणूक होत आहे, हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होते. आता कसे आहे, या जीआरमुळे मराठा समाजाला काही मिळणार नाही. आणि ओबीसी समाजाची भावना अशी होते आहे की या जीआरमुळे ओबीसी समाजाचे प्रचंड नुकसान होत आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar Asks Why Did Jarange Return To Mumbai

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात