Vijay wadettiwar : विजय वडेट्टीवार म्हणाले- अजित पवारांवर सत्ता सोडण्याची वेळ आणली जाईल; महायुतीत पहिला आघात राष्ट्रवादीवर होईल

Vijay wadettiwar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Vijay wadettiwar सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपकडून सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ आणली जाईल, असा दावा काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.Vijay wadettiwar

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी पार्थ पवार भूखंड घोटाळ्यात अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारबाहेर पडण्याचा इशारा दिल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी वरील दावा केला आहे. ते म्हणाले, पुण्यातील जमीन घोटाळ्यात पार्थ पवार जबाबदार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा घोटाळा बाहेर काढून भाजपने या प्रकरणी अजित पवार व त्यांच्या पक्षाची कोंडी केली आहे. या माध्यमातून आगामी निवडणुकीत पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपपुरक भूमिका घ्यावी असा डाव आहे.Vijay wadettiwar



भविष्यात महायुतीत सर्वात पहिला आघात अजित पवारांच्या पक्षावर केला जाईल. त्यानंतर त्यांच्यावर स्वतःहून सरकार बाहेर पडण्याची वेळ आणली जाईल.

उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, स्थानिकच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट ठेवण्यात आली आहे. उमदेवारी अर्ज 20 पानांचा आहे. हा अर्ज ऑनलाईन भरताना विविध अडचणी येत आहेत. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे हे अर्ज प्रत्यक्ष स्वीकारण्याची मागणी केली आहे.

आयोगाने अर्जात उमेदवारांना मागील निवडणुकीत किती मते मिळाली, संबंधिताने किती खर्च केला आदी माहितीही मागवली आहे. प्रत्यक्षात ही माहिती आयोगाकडेही उपलब्ध आहे. ती पुन्हा मागवण्याची काहीच गरज नाही. शेवटच्या क्षणी विरोधकांचे अर्ज स्वीकारले नाहीत अशी स्थिती निर्माण केली जाण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते अंबादास दानवे?

आमदार अंबादास दानवे पार्थ पवार प्रकरणात म्हणाले होते की, पुण्यातील भूखंड घोटाळ्याची भाजपला पूर्ण माहिती होती. हे सर्व उघड झाल्यानंतर अजित पवार अडचणीत येतील हे त्यांना ठावूक होते. ही एक मोडस ऑपरेंडी आहे. आता अजित पवारांची फाईल तयार केली आहे. उद्या त्यांनी काही केले तर एका मिनिटात पार्थ पवारांना अटक होऊ शकते. हे भाजपचे षडयंत्र आहे. त्यातूनच पार्थ पवार प्रकरण बाहेर आले.

वर्षावरील बैठकीत जे घडले त्यावर मला बोलायला वेळ नाही. पण माझ्या माहितीनुसार, त्या दिवशी जी बैठक झाली, त्यात अजित पवारांनी रागाने, त्वेषाने सरकारमधून बाहेर पडून सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यापर्यंत भूमिका घेतली. हे सर्व आमच्या कानावर आले आहे. खरे खोटे लवकरच बाहेर येईल. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे त्यांना व पार्थ पवार यांना वाचवले जात आहे, असे ते म्हणाले.

Vijay Wadettiwar Ajit Pawar Alliance Attack Mahayuti Photos Videos

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात