प्रतिनिधी
इंदापूर – इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा इशारा काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच आव्हान दिले आहे.vijay vadettiwar says, congress will contest indapur vidhansabha, throws challange to ajit pawar and datta bharane
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचा स्वबळाचा नारा दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी इंदापूरच्या जागेचा विषय काढून अजित पवारांपुढे आव्हान उभे केले आहे. इंदापूरचे वजनदार नेते हर्षवर्धन पाटील हे भाजपचे उमेदवार असतील.
ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, पण काँग्रेसचे उमेदवार कोण असतील, याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडीत बिघाडी होते काय, अशी स्थिती निर्माण झाल्याच बोलले जाऊ लागल आहे.
विजय वडेट्टीवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना आव्हान दिल्याने त्याचा परिणाम केवळ विधानसभेवर नाही, तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदार संघावर देखील होणार आहे. त्यामुळे, येत्या २०२४च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत तणाव निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः लक्ष घालून हर्षवर्धन पाटलांचे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी मन वळविले होते. हर्षवर्धन पाटील त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांना विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा अडथळा नसेल, असे शरद पवारांनी सांगितल्याचे म्हटले जात होते.
प्रत्यक्षात अडथळा आलाच. या घमासानमध्ये हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा मार्ग पत्करला. यात काँग्रेस इंदापूर तालुक्यात अनाथ झाली. पण आता विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस इंदापूरची जागा लढविणारच असे सांगितल्याने पक्षाच्या उरल्या सुरल्या कार्यकर्त्यांमध्ये जान आली आहे. शिवाय दत्तात्रय भरणे यांनाही केवळ अजित पवारांच्या भरवशावर निवडून येण्याची शाश्वती उरलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App