विदर्भ बनणार नव्या भारताचे ‘बेस्ट इन्वेस्टमेंट ‘डेस्टिनेशन’ – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

विदर्भात गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाचे नवे पर्व सुरु झाले, असंही फडणवीस म्हणाले आहेत.


विशेष प्रतिनिधी

नागपूर : नागपूरात आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव – ॲडव्हांटेज विदर्भ’ या कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उद्घाटन केले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार कृपाल तुमाने, खासदार सुनील मेंढे, खासदार अनिल बोंडे, खासदार अशोक नेते, आमदार मोहन मते, आमदार आशिष जयस्वाल अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.Vidarbha will become the ‘best investment destination of new India Devendra Fadnavis



यावेळी ‘ॲडव्हांटेज विदर्भ’ कार्यक्रमात उभारण्यात आलेल्या विविध दालनाची त्यांनी पाहणी केली. तसेच हवाई वाहतूक उद्योगाला चालना देण्यासाठी एआर इंदामेर यांनी नागपूरच्या तीन नामांकित संस्थांसोबत एमओआर साठी सामंजस्य करार (MoU) केला.

यावेळी औद्योगिक विकास आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ‘ॲडव्हांटेज विदर्भ’ हा कार्यक्रम महत्वाची भूमिका निभावेल. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, रस्त्यांचे नेटवर्क, ड्राय पोर्ट, विमानतळ, जलमार्ग, दुष्काळ निवारणासाठी वैनगंगा-नळगंगा कालवा आणि इतर जागतिक दर्जाच्या प्रकल्पांमुळे, विदर्भ हे गुंतवणुक, लॉजिस्टिक हब यांसोबतच पुरवठा साखळीतही महत्त्वाची भूमिका बजावेल. असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

याचबरोबर ‘पूर्व विदर्भ देशाचे स्टील हब म्हणून उदयास येईल. विदर्भात औद्योगिक विकास, पर्यटन उद्योग आणि धार्मिक पर्यटनाला चालना देऊन कुशल मनुष्यबळ, स्टार्टअप इकोसिस्टम आणि संरक्षण क्षेत्रासाठी हब तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नाने विदर्भात गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे.’ असंही फडणवीस म्हणाले.

Vidarbha will become the ‘best investment destination of new India Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात