Devendra Fadnavis : उपराष्ट्रपती निवडणूक निकालावरून CM फडणवीसांचा टोला- विरोधक तोंडावर पडले, त्यांना स्वत:ची मते राखता आली नाहीत

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis  उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. निवडणुकीआधी विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केले. ते जास्त बोलले. एनडीएचे मते फोडू असे सांगितले. पण उलटेच झाले. विरोधकांना स्वत:ची मते देखील राखता आली नाहीत, हे या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्यांची मोठी संख्या आमच्या एनडीए उमेदवाराला गेली आहे. विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचे आणि तोंडावर पडायचे, अशी अवस्था विरोधकांची आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.Devendra Fadnavis

राधाकृष्णन पदाची गरिमा वाढवतील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सी. पी. राधाकृष्णन आता भारताचे उपराष्ट्रपती झाले आहेत. ज्यावेळी त्यांची घोषणा झाली, त्यावेळेस मला विशेष आनंद झाला. कारण घोषणा करत असताना त्यांचा पत्ता हा मुंबई, राजभवन हा सांगितला गेला. महाराष्ट्रातील नागरिक, महाराष्ट्राच्या मतदार यादीतील मतदार असलेले सी. पी. राधाकृष्णन देशाचे उपराष्ट्रपती झालेले आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सी. पी. राधाकृष्णन त्यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळात त्या पदाची गरिमा वाढवण्याचे काम निश्चितपणे करतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.Devendra Fadnavis



सी. पी. राधाकृष्णन 152 मतांनी विजयी

एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मते मिळाली तर विरोधी पक्षाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली.

एकूण 781 सदस्यांपैकी 767 सदस्यांनी (एका पोस्टल मतपत्रिकेसह) मतदान केले, त्यापैकी 15 मते अवैध घोषित करण्यात आली. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान मंगळवारी सकाळी 10 वाजता सुरू झाले आणि सायंकाळी 7 वाजता संपले.

धगनड यांनी दिला होता राजीनामा

दरम्यान, जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी अचानक प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 पर्यंत होता. त्यांनी राजीनाम दिल्यामुळे उपराष्ट्रपती पदाची जागा रिकामी झाली होती. त्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन विजयी झाले आहेत.

Vice President Election, Devendra Fadnavis, Opposition, PHOTOS, VIDEOS, News

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात