विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dipu Das Murder बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेले अत्याचार आणि तरुण दिपू चंद्र दास याची जमावाकडून झालेली निर्घृण हत्या, याच्या निषेधार्थ आज मुंबईत संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात मंगळवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.Dipu Das Murder
बांगलादेशातील मैमनसिंग येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या 27 वर्षीय दिपू चंद्र दास या हिंदू युवकाची 18 डिसेंबर रोजी जमावाने अमानवी पद्धतीने हत्या केली होती. त्याच्या एका मुस्लिम सहकाऱ्याने त्याच्यावर ईशनिंदेचा खोटा आरोप केला होता. जमावाने दिपूला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचे प्रेत एका झाडाला टांगून पेटवून देण्यात आले. या प्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे, मात्र या घटनेमुळे जगभरातील हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.Dipu Das Murder
मुंबईत कफ परेड परिसरात तणाव
या घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील कफ परेड भागात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत बांगलादेश सरकार आणि कट्टरपंथीयांविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी दिपू दास याला न्याय देण्याची आणि बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणाची मागणी केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता आणि आंदोलनाला सुरुवात होताच अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.
दरम्यान, बांगलादेशमधील या घटनेच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीसह कोलकात्यातही तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. बांगलादेशात हिंदूंचे जगणे कठीण झाले आहे. दिपू दासची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली, ती माणुसकीला काळिमा फासणारी आहे. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणून तिथल्या हिंदूंच्या सुरक्षेची हमी मिळवावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App