विशेष प्रतिनिधी
मुंबई : Achyut Potdar मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी, हिंदी सिने सृष्टी आणि मालिकांच्या जगतातील एक अत्यंत प्रगल्भ, अनुभवी व लोकप्रिय कलाकार हरपला आहे.Achyut Potdar
अच्युत पोतदार यांनी 225 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी वयाच्या पन्नाशी नंतर अभिनयाला सुरुवात केली आणि आपल्या सहजसुंदर अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मने जिंकली. सारांश, नाम, दीवार, धर्मात्मा, मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगान, 3 इडियट्स यांसारख्या हिंदी चित्रपटांत तसेच आशीर्वाद, वादळवाट, वाऱ्यावरली विराणी यांसारख्या मराठी चित्रपटांत त्यांच्या भूमिकांनी विशेष ठसा उमटवला.Achyut Potdar
पोतदार हे मूळचे जळगावचे रहिवासी होते. वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली. नंतर इंडियन ऑइल कंपनीत अधिकारी म्हणून काम केले. निवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ अभिनयाला वाहून घेतले. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली असून अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि चाहत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अच्युत पोतदार यांच्या विषयी…
अच्युत पोतदार यांचा जन्म जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी पूर्ण केली. अभिनयापूर्वी ते भारतीय हवाई दलात काही काळ सेवेत होते. हवाई दलानंतर त्यांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये अधिकारी म्हणून काम केले.
वयाच्या 50 व्या वर्षानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 40 वर्षांच्या अभिनय प्रवासात त्यांनी 225 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सारांश, नाम, दीवार, धर्मात्मा, लगान, मुन्नाभाई एम.बी.बी.एस., 3 इडियट्स यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी लक्षवेधी भूमिका केल्या. याशिवाय आशीर्वाद, वादळवाट, वाऱ्यावरली विराणी यांसारख्या चित्रपटांत व मालिकांत त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App