विशेष प्रतिनिधी
नाशिक : शहरात नो- पार्किंगचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. बेशिस्त वाहनधारकांना लगाम घालण्यासाठी ही कारवाई केली जाणार आहे. वाहने घेऊन जाण्यासाठी टोईंगच्या प्रक्रियाची सुरूवात झाली आहे. Vehicles in No Parking zone will be picked up in Nashik
नाशिक पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांचे हस्ते मंगळवारी ता.६) सायंकाळी ५ वाजता पोलिस आयुक्त कार्यालयात वाहने उचलून नेण्याच्या प्रात्यक्षिक दाखवून टोईंग व्हॅन सेवेचे उदघाटन झाले.
यावेळी पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहायक पोलिस आयुक्त सीताराम गायकवाड आदीसह पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी पोलिस उपायुक्त संजय बरकुंड, अमोल तांबे, विजय खरात आदिंसह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App