विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीचे अतिवरिष्ठ नेते शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांची काल मुंबईतल्या हॉटेल सिझन्स मध्ये तब्बल 4 तास चर्चा झाली, पण प्रत्यक्षात त्या बैठकीचा कुठलाही निष्कर्ष निघाला नाही. बैठक सकारात्मक झाल्याचे एका ओळीत सांगून बाळासाहेब आंबेडकर निघून गेले, पण नंतर त्या बैठकीत सामील झालेले वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर व्हिडिओ शेअर करून संपूर्ण आघाडीची बैठकच “एक्स्पोज” करून टाकली. VBA leader exposed MVA MVA leaders over manoj jarange’s agitation and VBA’s proposal of obc candidates
महाविकास आघाडीच्या अतिवरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन + वंचित बहुजन आघाडीने दिलेला मूळ अजेंडा यावर महाविकास आघाडीचे नेते काहीच बोलले नाहीत. त्यांनी कुठले मतच व्यक्त केले नाही, अशा शब्दांमध्ये सिद्धार्थ मोकळे यांनी आघाडीच्या बैठकीला “एक्स्पोज” करून टाकले.
महाविकास आघाडीच्या बैठकीत काय ठरलं? pic.twitter.com/RQLN9dSAXS — Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 6, 2024
महाविकास आघाडीच्या बैठकीत काय ठरलं? pic.twitter.com/RQLN9dSAXS
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 6, 2024
महाराष्ट्रात किमान 15 ठिकाणी ओबीसी उमेदवार द्यावेत. त्यातून जनजागृती झालेल्या ओबीसी समाजाला योग्य लोकप्रतिनिधित्व मिळेल आणि त्यांची मते महाविकास आघाडीकडे वळतील, असा प्रस्ताव बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले आहेत, तर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी आपण कोणत्याही स्थितीत भाजपशी पुन्हा तडजोड करणार नाही, असे लेखी द्यावे, असेही आंबेडकरांनी प्रस्तावात म्हटले होते. मात्र या मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मौन बाळगले. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविषयी देखील आघाडीच्या नेत्यांनी कुठलीच चर्चा केली नाही. गेल्या तीन-चार बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे वेगवेगळे नेते महाविकास आघाडीच्या बैठकीत सामील होतात. वेगवेगळे मुद्दे उपस्थित करतात. परंतु त्यावर कोणताही निर्णय होत नाही, अशी खंत सिद्धार्थ मोकळे यांनी व्यक्त केली.
आजच्या बैठकीत बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतःची अकोला जागा सोडण्याची तयारी आघाडी बरोबरच्या नेत्यांच्या जेवणाच्या वेळी दाखविली, पण तुम्ही वंचितने मांडलेल्या प्रत्येक भूमिकेविषयी मत मांडा, असा आग्रह धरला, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यावर देखील मौन बाळगले, याकडे सिद्धार्थ मोकळे यांनी आपल्या व्हिडिओतून आवर्जून लक्ष वेधले.
आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची हॉटेल सिझन्समध्ये तब्बल 4 तास चर्चा झाली आणि पुन्हा एकदा बसू एवढाच अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्या बैठकीत झाला. निदान पुढच्या बैठकीत तरी महाविकास आघाडीचे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसून सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा सिद्धार्थ मोकळे यांनी व्हिडिओत शेवटी व्यक्त केली
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App