विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीच्या आजच्या हॉटेल ट्रायडेंट मध्ये झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीच्या मानापमान नाट्यानंतर गांधी – ठाकरे – पवारांचे पक्ष नमले. महाविकास आघाडीत वंचितच्या समावेशाचे पत्र त्यांनी लिहिले, पण या पत्रात जागावाटपाचा एकही शब्द लिहिलेला नाही. किंबहुना “हेच” या पत्राचे वैशिष्ट्य ठरले आहे!!VBA incorporated in MVA without seat sharing discussions
हॉटेल ट्रायडेंट मध्ये महाविकास आघाडीचे नेते एकत्र जमून त्यांनी प्राथमिक चर्चा केली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीलाही बोलावले होते. त्यानुसार वंचित आघाडीचे प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हॉटेल ट्रायडेंट मध्ये पोहोचले. पण त्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 1 तास बाहेरच बसवून ठेवले. जागावाटपाचा फॉर्म्युला विचारल्यानंतर आम्ही विचार करू एवढेच उत्तर दिले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीचा त्या बैठकीत अपमान झाल्याचे कारण दाखवून धैर्यवर्धन पुंडकर बैठक अर्धवट सोडूनच तसेच बाहेर निघून आले आणि त्यांनी माध्यम प्रतिनिधींकडे अपमान झाल्याची तक्रार केली. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातल्या पहिल्याच अधिकृत बैठकीत बेबनाव झाल्याचे स्पष्ट झाले. वंचित आघाडीच्या प्रतिनिधीचा अपमान झाल्याची बातमी सगळीकडे व्हायरल झाली. राजकीय वर्तुळात त्यामुळे खळबळ माजली.
त्यानंतर गांधी – ठाकरे आणि पवार यांचे पक्ष म्हणजे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष नमले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या सहीने प्रकाश आंबेडकरांच्या नावाने पत्र लिहिले. त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला अधिकृतरित्या महाविकास आघाडीत प्रवेश दिल्याचे त्यात नमूद केले.
आदरणीय श्री.प्रकाश आंबेडकर जी,@Prksh_Ambedkar @VBAforIndia pic.twitter.com/prp036Cu2S — Nana Patole (@NANA_PATOLE) January 30, 2024
आदरणीय श्री.प्रकाश आंबेडकर जी,@Prksh_Ambedkar @VBAforIndia pic.twitter.com/prp036Cu2S
— Nana Patole (@NANA_PATOLE) January 30, 2024
लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज या पत्रात या तिन्ही नेत्यांनी व्यक्त केली, पण जागावाटपाच्या फॉर्मुल्याबद्दल पत्रात चकार शब्दही लिहिला नाही.
मूळात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ही ठरलेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनीच मध्यंतरी महाविकास आघाडीचे तीन घटक पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांनी महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी प्रत्येकी 12 जागा लढवाव्यात, असा फॉर्म्युला दिला होता. मात्र, त्या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आणि पत्रात देखील त्या फॉर्मुल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उल्लेख देखील केलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App