भावनिक पोस्ट, राज ठाकरेंच्या फोटोला साष्टांग नमस्कार, मनसेला राम राम; वसंत मोरे “तुतारी” वाजवणार!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत माझी फार कोंडी होते आहे. मी पुण्यातून जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचा प्रयत्न करत असताना मनसेतलेच काही वरिष्ठ नेते त्यात खोडा घालत आहेत. साहेब, मला माफ करा, अशी भावनिक पोस्ट लिहून वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या फोटो समोर साष्टांग नमस्कार घातला आणि मनसेला रामराम ठोकला. वसंत मोरे आता लवकरच तुतारी वाजवण्याची चिन्हे आहेत. vasant more mns resignation

वसंत मोरे हे राज ठाकरेंचे पुण्यातले एक प्रमुख शिलेदार होते. राज ठाकरेंच्या वेगवेगळ्या पुणे दौऱ्यांच्या आयोजनात त्यांचा पुढाकार असायचा. वसंत मोरे यांनी महापालिका देखील गाजवली. परंतु, शहर प्रमुख पदाच्या वादामध्ये वसंत मोरे अडकले. मनसेमध्ये नेमके कोणते नेते आहेत आणि कोणते नेते नाहीत??, याचीच वानवा असताना वसंत मोरे यांनी मनसेचा झेंडा पुण्यात फडकवत ठेवला होता.

परंतु पक्षालाच जिथे भवितव्य उरले नव्हते, त्या मनसेमध्ये राहून वसंत मोरे यांचा फायदाही होणार नव्हता, याची जाणीव झाल्यानंतर वसंत मोरे यांनी टप्प्याटप्प्याने मनसेतून “एक्झिट” घेण्याची राजकीय व्यूहरचना केली. काहीच दिवसांपूर्वी एका विशिष्ट कामासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. ती भेट विशिष्ट कामासाठीच होती. कात्रज मधल्या एका जागेवरचे आरक्षण हटवण्यासंदर्भात होती, एवढाच खुलासा वसंत मोरे यांनी केला होता.

परंतु वसंत मोरे यांनी एकदम शरद पवारांची भेट घेणे याला “राजकीय रंग” नव्हता, असे कोणीच मानायला तयार झाले नाही आणि तोच “रंग” आज दिसला. वसंत मोरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर भावनिक पोस्ट लिहून राज ठाकरे यांच्या फोटो समोर साष्टांग नमस्कार घालून मनसेला राम राम ठोकला. वसंत मोरे यांनी राज साहेबांची माफी मागितली आता ते लवकरच आपली भूमिका जाहीर करणार आहेत परंतु ते लवकरच तुतारी वाजवतील, अशीच अटकळ पुण्याच्या राजकीय वर्तुळात बांधली गेली आहे.

तसेही पुण्यातला चर्चेतला चेहरा म्हणून वसंत मोरे यांची पडझड झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गरज आहेच, एकीकडे वसंत मोरे यांना राजकीय भवितव्य सावरण्यासाठी पवारांची मदत होण्याची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे सतत पडझड चाललेल्या राष्ट्रवादीला कोणीतरी आपल्या पक्षात आला याचे समाधान मिळणार आहे.

vasant more mns resignation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात