वंचित बहुजन आघाडीने निषेध केला “एपस्टीन मोदींचा”; पण फोटो चिकटवला आईन्स्टाईनच्या हेअर स्टाईल मधल्या मोदींचा!!

नाशिक : वंचित बहुजन आघाडीने निषेध केला “एपस्टीन मोदींचा”; पण फोटो चिकटवला आईन्स्टाईनच्या हेअर स्टाईल मधल्या मोदींचा!!, असला विचित्र प्रकार वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडिया हँडल वरून समोर आला.

अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातल्या युद्ध सगळे जग भरडले गेले. सगळ्या जगातला गॅस पुरवठा खंडित झाला. केंद्रातल्या मोदी सरकारने युद्धातले हे संकट नीट ओळखले नाही आणि भारतात गॅसचा पुरेसा साठा केला नाही. डॅश वाटपाचे नियोजन केले नाही, याचा निषेध वंचित बहुजन आघाडीने केला. पण हा निषेध करताना मोठा गडबड घोटाळा झाला. मोदींना एपस्टीनच्या रूपात दाखविण्याच्या ऐवजी त्यांना आईन्स्टाईनच्या हेअर स्टाईलच्या रूपात दाखविले गेले.



– एपस्टीनच्या ऐवजी आईन्स्टाईनच्या रूपातला फोटो

केंद्रातल्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी येत्या 23 मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढणार आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू आहे. अशाच कॅम्पेन मधल्या रील मध्ये वंचित बहुजन आघाडीने “एपस्टीन मोदींचा” निषेध केला, पण त्यामध्ये फोटो चिकटवला तो आईन्स्टाईनच्या हेअर स्टाईल मधल्या मोदींचा!!

अमेरिकेत सेक्स स्कॅण्डल आणि वेगवेगळे घोटाळ्या करणाऱ्या एपस्टीन आणि प्रख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांच्यातला साधा फरक सुद्धा वंचित बहुजन आघाडीतल्या सोशल मीडिया हँडल करणाऱ्या व्यक्तींना ओळखता आला नाही. त्यांनी‌ घोटाळेबाज एपस्टीनच्या ऐवजी शास्त्रज्ञ आईन्स्टाईनची बदनामी केली. मोदींना ठोकून काढताना आपण कोणतु चूक करतोय, याचे भानही त्यांना राहिले नाही.

Vanchit bahujan aghadi missed fire on Einstein

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात