सासरच्या छळाला कंटाळून उरळीकांचन येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. यासंदर्भात त्याच्या पत्नीसह पाचजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिनिधी
पुणे –सासरच्या छळाला कंटाळून उरळीकांचन येथिल एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. यासंदर्भात त्याच्या पत्नीसह पाचजणांविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी ( दि. १८) गुन्हा दाखल केला.Uralikanchan area Husband succide case because wife harashment
उरळीकांचनमधील खेडेकर मळा भागात २४ फेब्रुवारीला हा प्रकार घडला. राहुल विलास खेडेकर ( वय ३२, रा. खेडेकर मळा ) हे मृताचे नाव आहे. राहुल व त्याच्या सासरच्या मंडळींची किरकोळ कारणावरून भांडणे होत असत. त्यांच्या छळाला कंटाळून राहुलने २४ फेब्रुवारीला कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
हा प्रकार लक्षात आल्यावर त्याच्या नातलगांनी त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तेथून दुसऱ्याच दिवशी तो घरी परतला. मात्र, त्याला त्या विषाचा पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्याला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सोमवारी ( दि. १४) त्याचा मृत्यू झाला.
राहुलचे वडील विलास खेडेकर यांनी यासंदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार, राहुलची पत्नी, सासू, मेहुणी व शेजारच्या व्यक्तीविरुद्ध ( सर्व रा. शांतीनगर, वानवडी) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App