विशेष प्रतिनिधी
मुंबई : waqf सुधारणा विधेयक काल मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले, त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विधेयकाच्या विरोधात मतदान केले. त्यानंतर आज सरकारने राज्यसभेत ते विधेयक सादर केले. त्यावरून राज्यसभेत दोन्ही बाजूंमध्ये जोरदार गदारोळ झाला. त्याचवेळी मुंबईमध्ये एसंशि आणि युज अँड थ्रो यांच्यात जुंपली.
उद्धव ठाकरेंनी मुंबई मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी भाजप वर waqf board च्या जमिनीच्या व्यवहारात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला. Waqf मधल्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालायच्यात म्हणूनच ते waqf सुधारणा विधेयक घेऊन आलेत आणि त्यांच्या पाठीशी आता एसंशि म्हणजेच एकनाथ संभाजी शिंदे उभे राहिलेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उद्धव ठाकरेंनी “एसंशि” असा शॉट फॉर्म केला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणजे UT युज अँड थ्रो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरे आणि असदुद्दीन ओवैसी एकाच भाषेत बोलले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्यांनी अपमान केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसले. 2019 ला केला त्यापेक्षा जास्त मोठा अपराध उद्धव ठाकरेंनी काल केला. ते Waqf सुधारण्याच्या विरोधात गेले. गरीब मुस्लिमांवर त्यांनी अन्याय केला बाळासाहेबांचे विचार त्यांनी कायमचे टाकून दिले, असा प्रतिटोला एकनाथ शिंदे यांनी हाणला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App