वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधी ऐक्याच्या बैठकीस उपस्थित राहिलेत. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर खरपूस टीका केली आहे.Union Minister Narayan Rane on Maharashtra CM Uddhav Thackeray participating in meeting chaired by UPA chairperson Sonia Gandhi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर त्यांनी शिवसेनेचे खासदार निवडून आणलेत. ते आज सोनिया गांधींच्या बैठकीत गेले तर आम्हाला काय फरक पडतो?, असा रोकडा सवाल नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर मते मागून शिवसेनेने लोकसभेच्या निवडणुकीत 2014 आणि 2019 मध्ये पंधरा-सोळा खासदार निवडून आणलेत. त्यांच्या आमदारांची ताकद 56 पेक्षा जास्ती नाही. देशातल्या मोठ्या राजकारणात त्यांचा पक्ष खिसगणतीतही गृहित धरला जात नाही. ते आणि काँग्रेस पक्ष एकत्र येऊन भाजप सारख्या मोठ्या पक्षाला काय आव्हान देणार? इथून पुढच्या निवडणुकीत मोदींचेनाव नसेल तर त्यांचे किती खासदार आणि आमदार निवडून येतील?, असे बोचरे सवाल नारायण राणे यांनी केले.
Uddhav Thackeray & Shiv Sena are very small & only have 56 MLAs, what are they in this country? Shiv Sena MPs are also elected by blessings of PM Modi: Union Minister Narayan Rane on Maharashtra CM Uddhav Thackeray participating in meeting chaired by UPA chairperson Sonia Gandhi pic.twitter.com/5za6BOYnRG — ANI (@ANI) August 20, 2021
Uddhav Thackeray & Shiv Sena are very small & only have 56 MLAs, what are they in this country? Shiv Sena MPs are also elected by blessings of PM Modi: Union Minister Narayan Rane on Maharashtra CM Uddhav Thackeray participating in meeting chaired by UPA chairperson Sonia Gandhi pic.twitter.com/5za6BOYnRG
— ANI (@ANI) August 20, 2021
मूळात महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारचे दिवस भरत आले आहेत. लवकरच त्यांचे सरकार त्यांच्याच काळ्या कृत्यांनी पडेल आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत उपस्थित आहेत.
मात्र दिल्लीतलासत्ताधारी आम आदमी पक्ष, पंजाब मधले अकाली दल यांना सोनिया गांधींच्या काँग्रेसने विरोधी ऐक्याच्या बैठकीचे निमंत्रणच दिले नाही. मायावतींचा बहुजन समाज पक्ष या बैठकीत सहभागी झालेला नाही त्यामुळे हे तीन पक्ष वगळून सोनिया गांधी या विरोधकांचे ऐक्य साधू इच्छितात हे स्पष्ट झाले आहे. याच मुद्द्यावरून नारायण राणे यांनी विरोधी ऐक्याची खिल्ली उडविली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App