आगामी निवडणुकीपर्यंत उरलेले १५ आमदारही उद्धव ठाकरेंच्या हाताशी राहत नाहीत – नारायण राणेंचं विधान!

Rane and Uddhav

खेडची सभा पूर्वनियोजन होती, सभेला स्थानिक लोक नव्हती. असंही राणेंनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज राज्य विधिमंडळात जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. उद्याच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शुभेच्छा दिल्या. यानंतर विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. Union Minister Narayan Rane criticizes Uddhav Thackeray

नारायण राणे म्हणाले, ‘’उद्धव ठाकरेंची खेड येथील सभा पूर्वनियोजित होती. मुंबई, रायगड आणि रत्नागिरीहून लोकांना सभेसाठी आणलं होतं. ही सभा विराट सभा होती, हे दाखवण्यासाठी सभेतील खुर्च्यांमध्ये दोन लोक झोपतील एवढी जागा सोडली होती. सभेला स्थानिक लोक नव्हते. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काहीही केलं नाही, ते केवळ अडीच तास मंत्रालयात गेले. कोकणात अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं होते, त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत.’’

याशिवाय ‘’एकनाथ शिंदेंनी ४० आमदार नेले, मात्र उद्धव ठाकरे एकाही आमदाराला थांबवू शकले नाहीत. आता शिवसेना संपली आहे, दुकान बंद झालं आहे. आगामी निवडणुकीपर्यंत उरलेले १५ आमदारही त्यांच्या हाताशी राहणार नाहीत.” असं सूचक विधान नारायण राणेंनी केलं. याचबरोबर ‘’उद्धव ठाकरेंची ताकदच नाही. मंत्रालयात यायची त्यांची ताकद नव्हती, ते महाराष्ट्र कसा पिंजून काढणार? ते चार पावलं चालू शकत नाहीत. आता त्यांचं वय नाही. वयात असतानाही ते काही करू शकले नाहीत.’’ असा टोलाही यावेळी राणे यांनी लगावला.


विरोधी पक्षाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ राजकारण करायचं आहे, हे मगरीचे अश्रू आहेत – देवेंद्र फडणवीस


 

उद्धव ठाकरे यांनी खेडमधील सभेतून भाजपा व मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांकडूनही जोरदार प्रत्यत्तुर देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा काढणार असल्याचे समोर येत आहे, त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Union Minister Narayan Rane criticizes Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात