लालू प्रसाद यादव यांची एकच घोषणा ‘तुम्ही मला भूखंड द्या, मी तुम्हाला नोकरी देतो’ – अनुराग ठाकुर

के.कविता यांनाही केले लक्ष्य, जाणून घ्या काय म्हणाले?

विशेष प्रतिनिधी

पुणे : जमिनीच्या बदल्यात नोकरी या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्या परिवाराच्या विविध मालमत्तांवर ईडीने छापे घातले आहेत. या छापांची कारवाई गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावरील ईडी-सीबीआयच्या कारवाईवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. Union Minister Anurag Thakur criticizes Lalu Prasad Yadav and K Kavita

अनुराग ठाकूर म्हणाले, ‘’लालू प्रसाद यादव यांची एकच घोषणा होती “तुम्ही मला भूखंड द्या, मी तुम्हाला नोकरी देतो.” प्रत्येकाने भ्रष्टाचाराचे स्वतःचे मॉडेल बनवले आहे, आज त्यांच्यावर कारवाई झाली तेव्हा सर्वजण एकजुटीने उभे आहेत.’’


लालू, तेजस्वी यादव परिवाराच्या मालमत्तांवर छाप्यांत सापडले 1.5 किलो सोने, 70 लाख कॅश आणि बरेच काही!!


बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, राबडीदेवी विद्यमान उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांच्या तीन बहिणींच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मालमत्तांवर घातलेल्या छाप्यांमध्ये सक्तवसुली संचनालया अर्थात ईडीला 1.5 किलो सोने, 70 लाख रुपये कॅश, काही अमेरिकन डॉलर्स आणि बरीच कागदपत्रे सापडली आहेत.

के.कविता यांनाही केले लक्ष्य –

केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी के. कविता यांनाही लक्ष्य करून म्हटले की, ‘’नऊ वर्षांच्या सत्ताकाळात एकच महिला सक्षम झाली का? जेव्हा तुम्ही भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या गंभीर आरोपांमध्ये अडकता तेव्हा तुम्हाला महिला सक्षमीकरणाचा मुद्दा आठवतो. तेलंगणातील लूट कमी करण्यात तुम्ही यशस्वी झालात का? की आता जे तुम्ही दिल्ली गाठण्याचे ठरवले आहे.’’

याशिवाय ठाकूर यांनी करोना महामारीदरम्यान चुकीच्या माहितीचा प्रसार आणि खोटेपणाला ‘इन्फोडेमिक’ असे संबोधले आणि सांगितले की यामुळे जगभरात हजारो लोकांचे प्राण गमवावे लागले आहेत. पुणे शहरातील एका खासगी विद्यापीठात आयोजित युथ-20 (वाय20) सल्लागार बैठकीत ठाकूर बोलत होते. Y-20 हा सर्व G-20 सदस्य देशांतील तरुणांना एकमेकांशी संवाद साधण्यास सक्षम करण्यासाठी एक अधिकृत चर्चेचा मंच आहे.

Union Minister Anurag Thakur criticizes Lalu Prasad Yadav and K Kavita

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात