अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना तिहेरी तलाक, राम मंदिरावर प्रश्न विचारत साधला निशाणा, म्हणाले…

‘मुस्लीम आरक्षण नसावे हे भाजपाचे मत’, असल्याचेही शाह यांनी म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

नांदेड : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सक्रिय झाले आहेत. शाह यांनी शनिवारी (१० जून) नांदेडमध्ये मुस्लीम आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, मुस्लीम आरक्षण हे संविधानाच्या विरोधात असल्याने कोणतेही आरक्षण नसावे, असे भाजपाचे मत आहे. धर्मावर आधारित आरक्षण नसावे, यावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही शाहा म्हणाले. Union Home Minister Amit Shah criticizes Uddhav Thackeray from Nanded

गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले की, “मी उद्धव ठाकरेंना विचारू इच्छितो की कर्नाटकात स्थापन झालेल्या सरकारला इतिहासाच्या पुस्तकातून वीर सावरकरांना हटवाचे आहे, तुम्ही याच्याशी सहमत आहात का?  मी नांदेडच्या जनतेला विचारू इच्छितो, ” महान देशभक्त, त्याग पुरुष वीर सावरकरांचा आदर करावा की नाही? उद्धव ठाकरे, तुम्ही दोन नावेत पाय ठेवू शकत नाही. उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही त्यांचे सरकार तोडले. आम्ही त्यांचे सरकार तोडले नाही, शिवसैनिक निघून गेले. तुमचा पक्ष तुमच्या धोरणविरोधी बोलण्याने कंटाळला आहे.”

उद्धव ठाकरेंना काय विचारले प्रश्न? –

अमित शाह म्हणाले  उद्धव ठाकरे,

– आम्ही तिहेरी तलाक रद्द केला, तुम्ही सहमत आहात की नाही?

– जे राम मंदिर बांधले जात आहे ते तुम्हाला मान्य आहे की नाही?

– तुम्हाला समान नागरी कायदा हवा आहे की नाही हे तुम्ही स्पष्ट करा

– तुम्हीच सांगा मुस्लीम आरक्षण असावे की नाही?

– कर्नाटकातील तुमचे सहकारी वीर सावरकरांना इतिहासाच्या पुस्तकांमधून काढून टाकायचे आहे, तुम्हाला ते मान्य आहे का?

उद्धव ठाकरे, तुम्ही दोन नावेत पाय ठेवू शकत नाही. या सर्व मुद्यांवर तुमची भूमिका स्पष्ट करा, तुमची आपोआप पोलखोल होईल.

राहुल गांधी परदेशात जाऊन देशाचा अपमान करतात –  

काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधत अमित शाह म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे तिथे ‘मोदी…मोदी…मोदी’च्या घोषणा दिल्या जातात. एकीकडे मोदींना जगात मान मिळत आहे. दुसरीकडे काँग्रेसचे राजपुत्र राहुल बाबा परदेशात जाऊन देशाचा अपमान करत आहेत. राहुलबाबा,  देशाच्या राजकारणावर विदेशात बोलत नाहीत. तुम्हाला माहिती नसेल तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना विचारा. राहुल बाबा इथे बोलत नाहीत, परदेशात बोलतात कारण त्यांना ऐकणारे इथे कमी झाले आहेत.’’

Union Home Minister Amit Shah criticizes Uddhav Thackeray from Nanded

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात