राष्ट्रवादीत संघटनात्मक निवडणुकांना कायमच वाटाण्याच्या अक्षता; पवारांनी “लोकशाही”ला दाखवला नेहमीच चव्हाटा!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : एरवी शरद पवार लोकशाही, लोकशाही संस्था विधिमंडळातले संख्याबळ याविषयी आपण अत्यंत आग्रही असल्याचे सांगत असतात. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशी लढाई सुरू झाल्यावर अजितनिष्ठ गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीतल्या तथाकथित लोकशाहीला आणि शरद पवारांच्या “लोकशाही प्रेमाला” पूर्णपणे एक्सपोज केले. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर निवडणुकाच झाल्या नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत उघड्यावर आणले. Unable to hold organizational elections in NCP forever

निवडणूक आयोगाच्या कायद्यातील तरतुदीनुसार पक्षात पक्षाध्यक्षपदापासून ते तालुका पातळी पर्यंतच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका होऊन कार्यकारिणी नेमायची असते. ही प्रक्रिया गेल्या कित्येक वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालीच नाही. सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रवादीचे खुले अधिवेशन झाले. पण त्या अधिवेशनात फक्त नियुक्त्या झाल्या. त्यादेखील केंद्रीय पातळीवरच्या, याखेरीज प्रदेश, जिल्हा, तालुका या पातळीवरच्या निवडणुका झाल्या नाहीत. ज्या तांत्रिक असल्या तरी निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ही प्रक्रियाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या कित्येक वर्षात घडली नाही. किंबहुना 2003 नंतर घडली नाही, अशा स्पष्ट शब्दांत प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या “पवार प्रणित लोकशाही”चे वाभाडे काढले.



राष्ट्रवादीतले शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ हे दोन्ही गट राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगताना एकमेकांच्या गटांच्या नियुक्त नाकारत आहेत आणि एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्ट्या करत आहेत.

पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ घटनेच्या प्रमाणे अद्याप पक्ष संघटनेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, असे सांगून प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या कारकिर्दीत पक्षात संघटनात्मक पातळीवर कसे दडपशाही सुरू होती किंवा बजबजपुरी माजली होती, हेच “एक्सपोज” केले.

शरद पवार आणि बाकीचे विरोधी पक्ष देशात मोदी सरकार आल्यापासून लोकशाही संस्थांचा गळा घोटल्याचा गळा काढतात. पण स्व पक्षात मात्र किती लोकशाही आहे??, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पक्ष संघटनेच्या निवडणुका झाल्या का??, याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्याचे फटके आता पवारांच्या राष्ट्रवादीला बसणार आहेत.

खरी राष्ट्रवादी शरदनिष्ठांकडे की अजितनिष्ठांकडे याचा निकाल निवडणूक आयोग लावेलही. पण मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश, जिल्हा आणि तालुका पातळीपर्यंत संघटनात्मक निवडणुकाच झालेल्या नाहीत, याची गंभीर दखल निवडणूक आयोग घेतल्याशिवाय राहणार नाही. निवडणूक आयोगाने त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना अजितनिष्ठ आणि पवारनिष्ठ या दोघांनाही उत्तरे द्यावी लागणार आहेत निवडणूक आयोग त्याच मुद्द्यावर निर्णायक भूमिका घेऊन निकाल देणार आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या पत्रकार परिषदेतले हे अधोरेखित आहे.

Unable to hold organizational elections in NCP forever

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात