प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित मालेगाव सभे आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी अचानक पोहोचले आहेत. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सहकुटुंब सहपरिवार स्नेहभोजनासाठी बोलावल्याची बातमी आहे.Uddhav Thackeray’s Malegaon meeting on Chief Minister Eknath Shinde Raj Thackeray’s Shivtirtha!!
आज दिवसभर उद्धव ठाकरे यांच्या मालेगावच्या सभेची जोरदार चर्चा होती. मालेगावात लागलेले उर्दू बोर्ड आणि त्यावर लिहिलेले अली जनाब उद्धव साहेब ठाकरे या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सोशल मीडियात तुफान शेरेबाजी झाली
या दरम्यानच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब सहपरिवार राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्रातील इस्लामी अतिक्रमाणाविरुद्ध एल्गार पुकारला. त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने ताबडतोब कारवाई करून माहीम आणि सांगली कुपवाड मधील अतिक्रमण असलेले दर्गा – मशिद बुलडोझर लावून उध्वस्त केली. नाशिक मधील नवश्या गणपती शेजारील दर्ग्याला सात दिवसांची नोटीस दिली.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात पुढच्या कारवाईबद्दल आणि अन्य काही धोरणांबद्दल चर्चा होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
https://youtu.be/sYRpfyr81a4
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App