म्हणे, फडणवीस नागपूरला लागलेला कलंक; उद्धव ठाकरेंची उद्दाम टीका; खरा कलंक तर उद्धव ठाकरेच, गडकरी बावनकुळेंसह भाजप नेत्यांचा संताप!!


प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर असल्यासभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना अक्षरशः हद्द ओलांडली देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक असल्याची टीका त्यांनी केली मात्र उद्धव ठाकरे यांच्या टीकेवरून भाजपमध्ये प्रचंड संताप उसळला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. Uddhav Thackeray’s loud criticism on fadnavis

नागपुरात शिवसैनिकांना संबोधताना उद्धव ठाकरे यांनी खालची पातळी घाटात फडणवीसांवर टीका केली. नागपुरात गावठी कट्टा घाण ठेवला जातो. शेतकरी दागिने गहाण ठेवतो आणि त्याचे पैसे करतो पण फडणवीसांची अवस्था उपमुख्यमंत्री झाल्यावर सहन होत नाही,सांगता येत नाही, अशी झाली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे, अशी अश्लाघ्य टीका उद्धव ठाकरेंनी केली.

या टीकेनंतर महाराष्ट्र भाजपमध्ये प्रचंड संताप उसळला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार शरसंधान साधले आहे.

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली वैयक्तिक टीका महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही. त्यांनी केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. आमच्या सरकारच्या काळातले विकास कार्य आणि आपल्या काळातले विकास कार्यावर त्यांनी चर्चा जरूर करावी. पण खालच्या पातळीवरील व्यक्तिगत आरोप करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही, असे टीकास्त्र नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सोडले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. आमचे नेते मा. @Dev_Fadnavis यांचे काय कर्तृत्व आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं आहे. आणि तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात हे देखील तुमच्या सत्तेच्या अडीच वर्षांत लोकांनी अनुभवलं आहे. उद्धव ठाकरे तुम्ही २०१९ साली गद्दारी करून सत्ता मिळवली. सत्तेच्या अडीच वर्षांत तुम्ही कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं तुम्ही वाहिलं हेही महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं सामान्य शिवसैनिकांच्या खांद्यावर दिलं. घरात बसून फुकाच्या गप्पा मारत तुम्ही १०० कोटींची वसुली केली आणि महाराष्ट्र कलंकित केला. त्यामुळे महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक म्हणजे उद्धव ठाकरे आहेत.

– महाराष्ट्र भाजपचे ट्विट :

उद्धवजी, आमचे नेते आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यावर ” नागपूरला लागलेला कलंक” अशी घाणेरडी टीका करण्यापूर्वी स्वतःचा चेहरा आरश्यात बघितला असता तर तुमचा कलंकित आणि भ्रष्ट चेहरा तुम्हालाच दिसला असता. @uddhavthackeray तुम्हाला वेड लागले आहे. ‘भाजपा नेते मर्दाची औलाद असतील तर”अशी सडकछाप भाषा तुम्हीच वापरू शकता. माणूस पिसाळला की, त्याला भान राहत नाही. महाराष्ट्राला लागलेला तुम्ही कलंक आहात. वेड्यांचा इस्पितळात तुमच्यावर उपचार करण्याची गरज आहे. या कलंकित आजारातून लवकर बरे व्हा.

Uddhav Thackeray’s loud criticism on fadnavis

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात