विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांना पदावरून काढून टाकण्यात आले. पक्षाचे संस्थापक राज ठाकरे यांनी नगरसेवक साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना फोन केला. शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा अशा शब्दांत आमंत्रण दिल्याची चर्चा आहे. Uddhav Thackeray’s invitation to Vasant More directly? MNS resigns from Pune city president post
राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला. यानंतर मोरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. माझ्या प्रभागात हनुमान चालीसा लावणार नाही, सध्या रमजान सुरु आहेत, असे ते म्हणाले होते.
दरम्यान, माझी हकालपट्टी झालेली नाही. शेवटी पक्षात खांदेपालट होत असतात. माझ्यावरील कारवाई आधी मीच राज ठाकरेंना सांगितले की, मे नंतर मला शहराध्यक्षपदावर राहायचे नाही, असा दावा मोरे यांनी कालच केला होता. राजसाहेबांनी घेतलेला निर्णय मान्य आहे. त्यांच्यासोबत गेली २७ वर्ष मी काम करत आहे. साहेब माझ्या हृदयात असतील. सध्या तरी मनसे सोडण्याचा माझा विचार नाही, असेही ते म्हणाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App