उद्धव ठाकरेंचे “हिंदुत्व”, साजरा करणार भगवा सप्ताह; पण कारसेवकांना गोळ्या घालणाऱ्या समाजवादी पार्टीशी राखणार मित्रत्व!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आपले हिंदुत्व शेंडी जानव्यचे नाही, असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाचे नवे रूप आज समोर आले. एकीकडे उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांना भगवा सप्ताह साजरा करण्याचे आदेश दिले, तर दुसरीकडे आजच मातोश्रीवर त्यांनी अबू आझमी यांच्यासह समाजवादी पार्टीच्या खासदारांची भेट घेऊन त्यांच्याशी मित्रत्व राखले. ही तीच समाजवादी पार्टी आहे, ज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच मुलायम सिंह यादवांनी अयोध्येमध्ये कारसेवकांवर गोळीबार करून त्यांना ठार मारले होते. आता त्या समाजवादी पार्टीशी उद्धव ठाकरे मैत्री राखणार आहेत. Uddhav thackeray’s diluted hindutva, met SP leaders abu azmi and MP avdesh prasad pasi

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखून विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक घेतली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना ‘शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024’ ही नवी मोहीम दिली. पुढील 41 दिवसांत आचारसंहिता लागेल. त्यामुळे जोमाने काम करा. 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन करा, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना दिले. भगव्या सप्ताहमध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवन येथे सादर करायची आहे.

इच्छुकांची नावे मागितली

लवकरच विधानसभा मतदारसंघ निहाय बैठका घेऊन इच्छुक उमेदवारांसंदर्भात जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आदी पदाधिकारी यांच्यासोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे यांनी लोकसभा 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या आघाडीची कारणे आणि जिथे पिछाडी झाली त्याबाबतची कारणे मागितली आहेत.

सोबत आपल्या विभागतील सर्वपक्षीय जिल्हा परिषद, नगरसेवक, पंचायत समितीतील सदस्य संख्या. तसेच प्रत्येक मतदारसंघातील जातीनिहाय मतदार संख्या याची माहिती विधानसभा संपर्कप्रमुखांकडून मागितली आहे.

इतर पक्षांची माहितीही मागवली

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत मविआतील असलेले घटक पक्ष काँग्रेस, शरद पवार गट, संभाजी ब्रिगेड आणि अन्य संघटनांची आणि पक्षांची माहिती उद्धव ठाकरे यांनी मागवली आहे. याशिवाय पक्ष तळागाळात मजबूत होण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील, वकील, डॉक्टर, शिक्षक, महिला बचत गटाच्या मुख्य प्रवर्तिका आणि अन्य प्रभावी व्यक्तींची माहिती मागितली आहे.

एकीकडे उद्धव ठाकरेंनी अशी भगव्या सप्ताहाची तयारी चालवली असताना दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद पासी आणि खासदार धर्मेंद्र यादव यांनी यांना घेऊन अबू आजमी मातोश्रीवर गेले होते. याच अबू आझमी यांनी राज ठाकरेंवर समाजवादी पार्टीच्या खासदार सत्कार सोहळ्यात जोरदार तोंडसुख घेतले होते. या समाजवादी पार्टीच्या नेत्यांना उद्धव ठाकरे मातोश्रीवर भेटले. यातून त्यांच्या हिंदुत्वाचे हिरवेमिश्रित भगवे रूप समोर आले.

Uddhav thackeray’s diluted hindutva, met SP leaders abu azmi and MP avdesh prasad pasi

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात