उध्दव ठाकरे यांचे खास रवींद्र वायकर यांची ईडीकडून आठ तास चौकशी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्य समन्वयक आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे खास समजले जाणो शिवसेना नेते रवींद वायकर यांची सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी ८ तास चौकशी केली. वायकर हे जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.Uddhav Thackeray’s close Ravindra Vaikar interrogated by ED for eight hours

भाजप नेते किरीट सोमैया यांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी वायकर यांची चौकशी करण्यात आली. वायकर यांनी ईडीने विचारलेल्या प्रश्नांची ंउत्तरे देत काही कागदपत्रेही सादर केली आहेत. तसेच गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येऊ शकते, असेही ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.



शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सरकार आणि पक्ष, सरकारचे प्रकल्प आणि मुंबई महापालिका यांच्यात समन्वय ठेवण्याबरोबर प्रमुख प्रकल्पांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी वायकर यांच्यावर असेल.

तसेच त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. शिवसेना- भाजप युतीच्या सरकारमध्ये रविंद्र वायकर गृहनिर्माण राज्यमंत्री काम पाहत होते. उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील वायकर यांचा महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला नव्हता.

पंतप्रधान कार्यालयाच्या धर्तीवर मुख्यमंत्री कार्यालयात एका मंत्र्याची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावर ठाकरे यांचा विचार सुरू होता. या धर्तीवर रविंद्र वायकरांची नियुक्ती करण्यात आली

Uddhav Thackeray’s close Ravindra Vaikar interrogated by ED for eight hours

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात