Uddhav Thackeray : मी आणि राज एकत्र येणार का? असे कुणीतरी बोलले. मग आम्ही पाच जुलै रोजी काय केले?

Uddhav Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Uddhav Thackeray  मी आणि राज एकत्र येणार का? असे कुणीतरी बोलले. मग आम्ही पाच जुलै रोजी काय केले? तेव्हा मी बोललो आहे, आम्ही एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल, तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडून देणार नाही, असे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युती होणार असल्याचे स्पष्ट केले.Uddhav Thackeray

शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना ठाकरे म्हणाले, आमचा हिंदीला विरोध नाही. पण, आमच्यावर हिंदीची सक्ती करायची नाही. भाषावर प्रांतरचना झाली, त्यानुसार प्रत्येक भाषेला प्रांत मिळाला. गुजराती लोकांना गुजरात, बंगाली लोकांना बंगाल, कानाडी लोकांना कर्नाटक आणि वेगवेगळे राज्य देण्यात आले. तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाले. प्रत्येक राज्याला सरकार आणि राजधानी मिळाली. परंतु, महाराष्ट्राला राजधानी मिळाली नव्हती. नंतर मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली. ती मुंबई व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही.Uddhav Thackeray



शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दसरा मेळाव्यात एकत्र येतील, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. परंतु, राज ठाकरे हे दसरा मेळाव्यात येणार नसल्याचे दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले. यातच उद्धव ठाकरे हे राज ठाकरे आणि युतीबद्दल मेळाव्यात काय बोलतील? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, कंड्या पिकवल्या जात आहेत, दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का? पण मी सांगतोय, मराठी भाषेला हिंमत असेल तर हात लावून दाखवा, हात जागेवर ठेवणार नाही.

Uddhav Thackeray’s clarification on alliance with Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात