उपमुख्यमंत्री पद रद्द करा; भाजपवर निशाणा साधताना उद्धव ठाकरेंचे शिंदे + अजितदादांवरच घाव!!

Uddhav Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेतले विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला द्या, नाहीतर उपमुख्यमंत्री पद रद्द करा, असे वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला खरा, पण प्रत्यक्षात त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर घाव घातला.

वेगवेगळ्या पक्षातून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत उद्धव ठाकरे यांनी केले. त्यावेळी बोलताना त्यांनी विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदाचा विषय काढला. शिवसेनेचे फक्त २० आमदार असताना संपूर्ण महाविकास आघाडीच्या 49 आमदारांच्या बळावर उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्ष नेतेपद हवे आहे. परंतु, असे नियमात बसत नसल्याचे कारण दाखवत फडणवीस सरकारने ते पद निर्माण करणे टाळले आहे.



परंतु, उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांची राजकीय सोय लावण्यासाठी शिवसेनेकडे विरोधी पक्ष नेतेपद हवे आहे. परंतु, त्यांनी भाजपवर निशाणा साधताना प्रत्यक्षात घाव मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर घातला आहे. कारण सध्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असले तरी उपमुख्यमंत्री पदे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे आहेत.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीनुसार फडणवीसांनी खरंच उपमुख्यमंत्री पद रद्द केले, तर त्यातून भाजपच्या अंगावर कुठलाही राजकीय ओरखडा उठण्याची शक्यता नाही‌. उलट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाच त्याचा राजकीय फटका बसेल. पण उद्धव ठाकरे यांनी मागणी केली म्हणून भाजप असा उपमुख्यमंत्री पद रद्द करायचा कुठला निर्णय घेईल, असे उद्धव ठाकरेंना वाटत असेल, तर तीही सुतराम शक्यता नाही.

Uddhav Thackeray’s attack on Shinde +Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात