विशेष प्रतिनिधी
मुंबई : याला म्हणतात, महाविकास आघाडी; रत्नागिरीतल्या नेत्याला शिवसेनेत घेऊन उद्धव ठाकरेंनी काँग्रेस फोडली!!
त्याचे झाले असे :
रत्नागिरीतले जुने शिवसैनिक सहदेव बेटकर विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये गेले त्या पक्षाच्या चिन्हावर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली, पण ते तिथून पराभूत झाले. सहदेव बेटकर काँग्रेसमध्ये कंटाळले आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परत आले. त्यावेळी संजय राऊत यांनी महाभारत कालीन भाषण ठोकले. उद्धव ठाकरे हे श्रीकृष्ण आहेत. मी संजय आहे आणि सहदेव आता आपल्यात परत आला आहे, असे ते म्हणाले. शिवसेना हेच आपले आता कायमचे घर असल्याचे सहदेव बेटकर म्हणाले.
वास्तविक महाविकास आघाडी बनवताना उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पाटोले यांनी महाविकास आघाडीतले घटक पक्ष एकमेकांच्या नेत्यांनी फोडायचे नाहीत. एकमेकांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपापल्या पक्षांमध्ये प्रवेश द्यायचा नाही, असे राजकीय सूत्र ठरविले होते. महाविकास आघाडी सत्तेवर असेपर्यंत हे सूत्र चालले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असण्याच्या त्या कालावधीत महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी एकमेकांचे पक्ष फोडले नाहीत. एकमेकांच्या नेत्यांना आपापल्या पक्षांमध्ये प्रवेश दिला नाही. कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ ऍडजेस्टमेंट फक्त केल्या. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीची सत्ता गेली. त्यामुळे नेत्यांनी ठरविलेले राजकीय सूत्र ढिल्ले पडले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर तर महाविकास आघाडीचे अस्तित्व केवळ पेपर मधल्या बातम्यांपुरते उरले. आज तर उद्धव ठाकरेंनी जुना शिवसैनिक परत आपल्यात घेताना कोकणातली काँग्रेस फोडली.
तिकडे कराडमध्ये देखील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्ती काँग्रेसचे शहर प्रमुख प्रशांत चांदे यांनी पृथ्वीराज बाबांची साथ सोडून हातात कमळ घेतले. पृथ्वीराज बाबा काँग्रेसचे राष्ट्रीय स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी आमदाबाद मधल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहभागी झाले, पण कराडमध्ये मात्र त्यांच्या समर्थकानेच धक्का देऊन काँग्रेसला गळती लावली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App