• Download App
    उद्धव ठाकरे राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले, 32 वर्षांच्या पापाचा घडा भरणार, नारायण राणे यांचा आरोप Uddhav Thackeray set out to destroy state, 32 year old will be punished, Narayan Rane alleges

    उद्धव ठाकरे राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले, 32 वर्षांच्या पापाचा घडा भरणार, नारायण राणे यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारला कंटाळली असून हे सरकार राज्याचा कोणताच विकास करु शकत नाही,. 32 वर्षांच्या पापाचा घडा भरल्याशिवाय राहणार नाही अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली . Uddhav Thackeray set out to destroy state, 32 year old will be punished, Narayan Rane alleges

    राणे यांनी आज मुंबई विमानतळावरुन जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी देखील नारायण राणेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते.



    राणे यांनी दादर येथील शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक स्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर जाऊन मी नतमस्तक झालो.

    मी एवढंच सांगितलं की साहेब, आज तुम्ही मला आशीर्वाद द्यायला हवे होते. मला बाळासाहेबांनीच घडवलेलं आहे, दिलेलं आहे. आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच यश मिळव, माझा आशीर्वाद आहेत.

    असं म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता. आज जरी हात नसला, तरी बाळासाहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत असं मला वाटतं, असं राणे म्हणाले. ही यात्रा यशस्वी होईल आणि येणारी महानगर पालिका भाजपा जिंकणार. ३२ वर्षांचा पापाचा घडा या ठिकाणी फुटल्याशिवाय राहणार नाही

    Uddhav Thackeray set out to destroy state, 32 year old will be punished, Narayan Rane alleges

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!

    435 कोटी थकबाकीच्या कारखान्याच्या गोडाऊनला बँकेने ठोकले सील; पवार समर्थकांनी त्याचा संबंध जोडला पवारांच्या सभेशी!!