Narayan Rane : खासदार झाले, आता पुढचा नंबर आमदारांचा; भाजप नेते नारायण राणेंचे मोठे विधान; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत काय म्हणाले राणे?
शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि ठाकरे गटाला पुन्हा एकदा बंडखोरीला सामोरे जावे लागले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेत आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील काही आमदारांची अनुपस्थिती होती. यावरून पुन्हा उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या असून आता यात भाजप नेते नारायण राणे यांनी मोठे विधान करत म्हटले, खासदार गेले आता आमदारही फुटू शकतात.