प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा मनसूबा रचला आहे, पण शरद पवारांनी मात्र त्यांना आयोगाचा निकाल स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.Uddhav Thackeray plans to go to the Supreme Court, but Pawar’s advice to accept the Election Commission’s decision!!
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या निकालावर मत व्यक्त केलं आहे.
हा निवडणूक आयोगाचा निकाल आहे, एकदा निकाल लागल्यावर त्यावर चर्चा करता येत नाही. तो स्वीकारायचा आणि नवीन चिन्ह घ्यायचे असते. त्याचा काही फार परिणाम होत नसतो. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी असताना हा वाद झाला होता. काँग्रेसचे गाय-वासरू चिन्ह होतं, पण त्यांनी हाताचा पंजा चिन्ह घेतले, पण त्यामुळे काही फरक पडला नाही. लोकांनी ते चिन्ह स्वीकारले. आताही फरक पडणार नाही, काही दिवस चर्चा होत राहील, नंतर लोक विसरून जातील, असे सांगून शरद पवार यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय स्वीकारण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आहे आपला मोर्चा सुप्रीम कोर्टात जाण्याचा मनसूबा कायम ठेवतात की पवारांचा सल्ला ऐकतात?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरेंसमोर नवी अडचण
उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता नवी अडचण उभी राहिली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची हा वाद सुरू असताना ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिले होते. पण आता केंद्र सरकारचे गुलाम निवडणूक आयोग हे चिन्हही काढून घेतील, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला मिळाल्यानंतर समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. मशाल निवडणूक चिन्ह हे समता पार्टीचे आहे आणि या चिन्हासाठी समता पार्टी सुप्रीम कोर्टात जाईल, असे उदय मंडल यांनी म्हटले आहे. उदय मंडल यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे एका बाजूला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर दुसरीकडे मशाल हे नवे चिन्हही धोक्यात येणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App