विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीत शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे, तर शरद पवारांच्या पक्षाला सत्तेची वळचण खुणावते आहे. महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस सरकार विरुद्ध लढण्याची ठाकरे आणि पवारांची जिद्द संपली आहे.
उद्धव ठाकरे यांना कोकणातून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कोकणात उद्धव ठाकरेंना विधानसभा निवडणुकीमध्ये फारसे यश मिळाले नाही त्यामुळे त्यांच्या शिवसेनेचा तिथला बालेकिल्ला हादरला, पण आता तिथले उरलेले शिवसैनिक देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याची शक्यता असून राजन साळवी हे कोकणातले प्रमुख नेते उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे पुण्यातले 6 माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करायच्या तयारीत आहेत. त्यामध्ये विशाल धनवडे, बाळा ओसवाल संगीता ठोसर आदी नगरसेवकांचा समावेश असून ते 5 जानेवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे यापैकी विशाल धनवडे आणि बाळा ओसवाल यांनी जाहीरपणे सोशल मीडियावर पोस्ट लिहून शिवसेना सोडली आहे.
Sharad Pawar : गुरुने दिला शरणागतीचा वसा; चला पुतण्याच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसा!!
एकीकडे शिवसेनेला अशी गळती लागले असताना दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपच्या आणि अजित पवारांच्या सत्तेची ओळखण खुणावते आहे शरद पवारांच्या 8 खासदारांनी आणि 10 आमदारांनी त्यांच्याकडे भाजप बरोबर जाण्यासाठी आग्रह धरला असून लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विलीनीकरण करण्याच्या दृष्टीने वातावरण निर्मिती सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आई आशाताई पवार, प्रफुल्ल पटेल, नरहरी झिरवाळ, दत्तात्रय भरणे या सगळ्यांची वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेच्या वळसणीला घाई झाल्याचीच दिशा निर्देशक आहेत. पवार काका पुतण्यांनी एक होऊन सत्तेच्या वळचणीला यावे असा सगळ्यांनी आग्रह धरला आहे. याचा अर्थ शरद पवारांच्या पक्षाची सत्ताधाऱ्यांविरुद्ध टक्कर घेण्याची क्षमता संपली असून सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली देखील त्यांची वेगळी राष्ट्रवादी काँग्रेस उभारी घेण्याची शक्यता नाही, याचीच कबुली पवारांच्या पक्षातले नेते अप्रत्यक्षपणे देत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App