विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या मोहापायी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यांच्या सरकारमधील मंत्री एकेक करून तुरुंगात जात आहेत, भविष्यात ठाकरे यांना तुरुंगात जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची वेळ येऊ शकते,Uddhav Thackeray may have time to hold cabinet meeting in jail, criticizes BJP national general secretary Tarun Chugh
अशी टीका भाजपचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग यांनी केली आहे.मराठवाडा दौऱ्यावर असताना चुग म्हणाले, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी घात करून हे सरकार स्थापन झाले आहे. आज शिवसेनाप्रमुख असते तर दु:खी झाले असते. सरकारचे अनेक घोटाळे, वसुलीची प्रकरणे समोर येत आहेत.
या षडयंत्री सरकारमधील काही मंत्री तुरुंगात गेले असून काही जण जातील.काँग्रेसने महागाईवर आंदोलन करण्याच्या दिलेल्या इशाऱ्यावर चुग म्हणाले, काँग्रेसने महागाईवर बोलू नये. ज्या पक्षाला पाच राज्यांतील निवडणुकीत सामान्य जनतेने नाकारले, त्या काँग्रेसला सामान्यांच्या प्रश्नांची जाण कशी असणार.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App