उद्धव ठाकरे “फक्त” कुंदा मावशींना भेटायला शिवतीर्थावर; अडीच तासांच्या चर्चेत म्हणे नव्हते “राजकारण”!!

नाशिक : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुसऱ्यांदा शिवतीर्थावर गेले. त्यामुळे मराठी माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा रंगली. आगामी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना आमंत्रण देणार, दसरा मेळाव्यातच ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा होणार वगैरे बातम्या मराठी माध्यमांनी पेरल्या, पण उद्धव ठाकरे फक्त कुंदा मावशीला म्हणजे राज ठाकरे यांच्या मातोश्रींना भेटायला शिवतीर्थावर गेले होते आणि अडीच तासांच्या त्यांच्या चर्चेत राजकारण नव्हतेच, असा दावा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवतीर्थावर गेलेले संजय राऊत यांनी केला.

मूळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुरती पीछेहाट झाल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आले. परंतु, एकत्र येऊन भाषणे करण्याखेरीज त्यांनी कुठलीही राजकीय युती जाहीर केली नाही. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही बंधूंनी म्हणजेच शिवसेना आणि मनसेने युती करून निवडणूक लढवली, पण त्या युतीचा बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत काहीही फायदा झाला नाही. उलट उद्धव ठाकरेंच्या हातातली आहे ती सत्ता गेली.



– गणपतीच्या दर्शनाला उद्धव ठाकरे, कुंदा मावशींचा आग्रह

तरी देखील ठाकरे बंधूंनी आपले ऐक्य मागे घेतले नाही. उद्धव ठाकरे गणेशोत्सवात शिवतीर्थावर गणपतीच्या दर्शनाला गेले, त्यावेळी देखील माध्यमांनी मोठ्या बातम्या दिल्या, पण तेव्हा दोन्ही बंधूंनी गणेश दर्शनाच्या वेळी राजकारणावर चर्चा केली नाही. त्यानंतर आज अचानक उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचले. त्यामुळे दोन्ही बंधूंच्या राजकीय युतीच्या चर्चेला उधाण आले. पण उद्धव ठाकरे तिथे अडीच तास होते. या दोघांच्याही चर्चेमध्ये कुठलेही राजकारण आले नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे हे गणपतीच्या दर्शनाला गेले होते, तेव्हा कुंदा मावशी उद्धव ठाकरेंना म्हणाल्या होत्या की आता तू फार घाईगर्दीत आला आहेस. आपल्याला बोलायला वेळ मिळालेला नाही. त्यामुळे तू नंतर मला भेटायला ये. म्हणून उद्धव ठाकरे आज फक्त कुंदा मावशींना भेटायला शिवतीर्थावर गेले. मी हे सत्य सांगतो आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांच्या दाव्यानुसार शिवतीर्थावरील अडीच तासांच्या चर्चेत कुठलेही राजकारण नव्हते. मात्र यावर विश्वास ठेवायचा तरी कसा??, असा प्रश्न महाराष्ट्राला पडला.

Uddhav Thackeray goes to Shiv Tirtha “just” to meet Kunda aunts

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात