वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस प्रणित यूपीएमध्ये नसलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अखेर काँग्रेस पासून दूर जाण्याचे एक पाऊल आज पडले. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, या मुद्द्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदारांनी आज सायंकाळी काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे.Uddhav Thackeray faction decides not to attend the meeting at Mallikarjun Kharge’s residence today because Rahul Gandhi said that I am not Savarkar, I am Gandhi
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आज काँग्रेस सह 18 पक्षांची खासदारांची बैठक होणार आहे यामध्ये ठाकरे गटाला निमंत्रण आहे परंतु या बैठकीत ठाकरे गट सहभागी होणार नाही अशी माहिती संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.
शिवसेना भाजपचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना भाजप यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंमत असेल, तर काँग्रेस पासून दूर होऊन दाखवा. महाविकास आघाडीतून बाहेर पडा, असे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथी गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे यांचे देखील वाभाडे काढले आहेत. सत्तेच्या खुर्चीसाठी काँग्रेस जवळ बसण्याऐवजी सावरकरांच्या अपमान करणाऱ्या काँग्रेस पासून दूर होण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी बोलावलेल्या बैठकीत सहभागी होणार नाहीत. हे ठाकरे गटाचे काँग्रेस पासून पाऊल दूर पडल्याचे राजकीय चिन्ह दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App