Uddhav Thackeray : राज्यात झुंडशाही सुरू, लोकशाही संपली, दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचे निलंबन करा; उद्धव ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Uddhav Thackeray निवडणुका बिनविरोध करण्यासाठी कशाप्रकारे धमक्या दिल्या जात आहेत, कशाप्रकारे संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींकडून अधिकाराचा गैरवापर केला जात आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे. शिवसेना भवनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी वचननामा जाहीर केला. यावेळी ते बोलत होते. Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात एकूणच झुंडशाही सुरु झाली आहे, लोकशाही आत्ता संपली आहे. मतचोरीनंतर आता उमेदवारांची पळावापळवी सुरु केली आहे, निवडणुका बिनविरोध होत आहेत. राहुल नार्वेकर धमक्या देत आहेत, हा विषय निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतला पाहिजे आणि अध्यक्ष म्हणून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी ठाकरेंनी केली. Uddhav Thackeray



पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. राहुल नार्वेकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अध्यक्ष कोणत्या पक्षाचे नसतात, ते आमदारासारखे वागू शकत नाही. दमदाटी करून बिनविरोध उमेदवार निवडून आणले जात आहेत, त्यांनी त्या ठिकाणच्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे, जिथे बिनविरोध निवडणूक झाल्या, तिथे पुन्हा निवडणूक घेतल्या पाहिजे. विधानसभा अध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा नसतो आणि तो कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी किंवा समर्थनासाठी जाऊ शकत नाहीत. परंतु, त्यांनी संरक्षण काढून घेण्याचे आदेश जे काही दिले, हा त्यांना अधिकार बाहेर नसतो, विधानसभेत असू शकतो.

पालिकेच्या ठेवी कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटायला नसतात- उद्धव ठाकरे

मुंबई महापालिकेच्या निधीतून आपण कोस्टल रोड तयार केला आहे आणि तोही टोल मुक्त. मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका होती, असे म्हणावे लागेल, ज्यात आपण 92 हजार कोटीपर्यंत ठेवी ठेवल्या होत्या. यातूनच आपण विकासकामे केली आहेत. नितीन गडकारींचा मुंबई-गोवा महामार्ग अजूनही तयारच होत आहे. ठेवी या काही चाटायला नसतात, पण याच ठेवी कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटायला नसतात, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. साधारण 3 लाख कोटींचा घोटाळा महायुतीने केला आहे. ही माझ्याकडे माहिती आली असल्याचे ठाकरेंनी म्हटले.

Uddhav Thackeray Demands Suspension of Rahul Narwekar Over BMC Poll Controversy PHOTOS VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात