विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे गप्प बसले. त्यांच्या शिवसेनेची सगळी बाजू विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांभाळली. दानवे यांनी वेगवेगळ्या विषयांवर महायुती सरकारला घेरले. पण त्यांच्या शेजारी बसलेले उद्धव ठाकरे विधान परिषदेमध्ये एकदाही भाषण करायला उठले नाहीत. त्यांनी विधिमंडळाच्या आवारामध्ये पत्रकारांना वेगवेगळ्या विषयांवर प्रतिक्रिया दिल्या.शश त्यात प्रामुख्याने दिशा सालियन आणि कुणाल कामरा यांचे विषय होते. नंतर उद्धव ठाकरे कोणालातरी हरामखोर असे म्हणाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पण विधान परिषदेच्या सभागृहात उद्धव ठाकरे यांनी कुठल्या विषयावर भाषण केल्याची बातमी कुठे समोर आली नाही.
मात्र, विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्या पत्रकार परिषदेत भाषण केले. त्यांनी भाजपच्या सौगात ए मोदी उपक्रमावर टीका केली. हिंदूंच्या हातात घंटा आणि मुसलमानांना सौगात असला प्रकार भाजप जनतेच्या पैशाने करत असल्याची टीका त्यांनी केली. त्याचबरोबर खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशी राक्षसी बहुमत मिळालेल्या महायुती सरकारची अवस्था असल्याचे देखील ते म्हणाले.
विधिमंडळ अधिवेशनाने जनतेला काहीच दिले नाही. कारण महायुतीचे मंत्री सत्तेच्या मस्तीत राहिले पण या अधिवेशन काळामध्ये कुणाल कामराच्या रूपाने भारतातल्या लोकांना चांगले गाणे मात्र मिळाले अशी शेरेबाजी उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना एकच आहे. समोर आहे ती गद्दार सेना आहे त्यामुळे हॅबिटॅट स्टुडिओमध्ये झालेल्या तोडफोडेशी शिवसेनेचा संबंध नाही शिवसैनिकांनी तिथे जाऊन तोडफोड केली नाही. तोडफोड झाली असेल, तर ती गद्दार सेनेने केली असेल, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App