नाशिक : 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोन न घेणारे उद्धव ठाकरे 2022 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना दोनदा फोन करतील का?? आणि केला तरी फडणवीस या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी त्यांचा फोन घेतील का?? आणि फोन घेतले तर भाजपच्या अति वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीशिवाय ते कोणता निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतील का?? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. Uddhav Thackeray called devendra Fadanavis twice, but is it true??, or speculation from Pawar camp??
ही बातमी येत असतानाच देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत.
एबीपी माझा वृत्तवाहिनीने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने उद्धव ठाकरे यांनी 21 जून 2000 22 रोजी देवेंद्र फडणवीस यांना दोनदा फोन केल्याची बातमी दिली आहे. परंतु, शिवसेनेतील सूत्रांनी ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याने ती फेटाळून लावली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना फोन करतील का? आणि देवेंद्र फडणवीस त्यांचा फोन घेतील का??, हा प्रश्न तयार झाला आहे.
मूळात 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार फोन करूनही उद्धव ठाकरेंनी त्यांचा फोन घेतला नाही म्हणून तर शरद पवार महाविकास आघाडीचा जुगाड करून सध्याचे ठाकरे – पवार सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आणू शकले. पण आता जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड करून महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आणले आहे आणि भाजपची सत्ता महाराष्ट्रात येण्याचे घाटत आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांचा फोन स्वीकारण्याची शक्यता आहे का??, हा प्रश्न आहे.
– तीन वेळा बंद दाराआड चर्चा
अर्थात याआधी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन वेळा बंद दराआड चर्चा झाली आहे. पण त्याची कारणे पूर्णपणे वेगळी होती. नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेच्या वेळी जेव्हा ठाकरे परिवारावर सडकून टीका करत होते तेव्हा टीका बंद करण्यासाठी किंवा काहीशी सौम्य करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृहामध्ये बंद दाराआड 15 मिनिटे चर्चा केली होती. त्याआधी फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी अशीच बंद दराआड चर्चा केल्याच्या बातम्या आल्या होत्या. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी देखील शिष्टमंडळाची चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांबरोबर स्वतंत्र चर्चा केली होती.
परंतु हे तिन्ही चर्चेचे विषय हे राजकीय स्वरूपाचे आणि ठाकरे – पवार सरकार स्थिर असतानाचे घडले होते आता ठाकरे पवार सरकार पूर्ण अडचणीत आले आहे. किंबहुना अल्पमतात आले आहे आणि हे अल्पमतातले सरकार वाचविण्याचा शरद पवार प्रयत्न करत आहेत.
अशा वेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतःला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला असेल का? उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून देवेंद्र फडणवीस यांचा फोन घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतील का?? हे मूलभूत प्रश्न आहेत.
या खेरीज एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ज्या एबीपी माझा, महाराष्ट्र टाइम्स आणि टीव्ही 9 मराठी यांनी ही बातमी दिली आहे ही तीनही माध्यमे शरद पवारांची जवळची मानली जातात. त्यामुळे शिवसेनेसाठी अत्यंत नाजूक असलेल्या या परिस्थितीत फडणवीस – ठाकरे चर्चेची बातमी पवार गटातून तर सोडण्यात आलेली पुडी तर नाही ना!!, असे मानण्यास देखील वाव आहे.
– मराठा संघटना शिंदे यांच्या पाठीशी; पवारांचा वेगळा डाव??
एकनाथ शिंदे गटाने बंद केल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेला आता विविध मराठा संघटना पाठिंबा देत आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना विमानतळ उतरू देणार नाही. मुंबईत फिरू देणार नाही अशा धमक्या देत असताना मराठा संघटनांचे नेते शिंदे यांच्या बाजूने मैदानात उतरण्याचे इशारे देत आहेत. याचा अर्थ शरद पवार डबल गेम खेळत आहेत का?? असाही प्रश्न या निमित्ताने तयार होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App