दोन्ही नेते कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर
प्रतिनिधी
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी गावाबाहेर राहूनच नरसिंहवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधला. तर देवेंद्र फडणवीस भर पुराच्या पाण्यात काल नरसिंहवाडीत जाऊन ग्रामस्थांशी बोलले. दोन्ही नेते वेगवेगळ्या वेळी नरसिंह वाडी तील ग्रामस्थांशी बोलले आहेत. Uddhav Thackeray and Devendra Fadanavis in Kolhapur
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरानंतर झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिरोळ तालुक्यात पाहणी केली.
कोकणातील महाड व चिपळूण तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस हे देखील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून करवीर तालुक्यातील पूरग्रस्तांशी संवाद साधला आहे.
नरसिंहवाडी हे गाव अजूनही पुराने वेढलेले. गावाबाहेर थांबूनच मुख्यमंत्र्यांनी साधला पूरग्रस्तांशी संवाद साधला. तर फडणवीस यांनी थेट गावात जाऊन ग्रामस्थांशी भर पाण्यात उभे राहून संवाद साधला.
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेक नेते मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रथम नरसिंहवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद केला.
Maharashtra CM Uddhav Thackeray visits flood-affected Nrusinhawadi, Shirol in Kolhapur pic.twitter.com/a8BtEyTdlf — ANI (@ANI) July 30, 2021
Maharashtra CM Uddhav Thackeray visits flood-affected Nrusinhawadi, Shirol in Kolhapur pic.twitter.com/a8BtEyTdlf
— ANI (@ANI) July 30, 2021
शिरोळ तालुक्यातील महापुराचा फटका टाळण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करू, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्वाही दिली. सतत पूर येत असल्यामुळे आमचे प्रचंड नुकसान होत आहे, त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढा; अशी मागणी पूरग्रस्तांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे करवीर तालुक्यातील चिखली या गावातील पूरग्रस्तांची संवाद साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App