विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका करताना त्यांच्यावर भ्रष्टाचार, हिंदुत्वाचा त्याग आणि मुस्लिम तुष्टीकरणाचे गंभीर आरोप केले आहेत. रॅडिकल इस्लामिक फंडामेंटलिस्ट प्रयत्नांना बळकट देण्याचे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न असल्याचे अमित साटम म्हणालेत. तसेच 1997 ते 2022 या कालावधीत मुंबई महानगरपालिकेत देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला. तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून त्यामागे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या प्रशासनाचा थेट हात आहे, असा दावा अमित साटम यांनी केला.Uddhav Thackeray
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी नुकतीच एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.Uddhav Thackeray
नेमके काय म्हणाले अमित साटम?
ते म्हणाले, 25 वर्षे मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाने राज्य केले. या काळात मुंबईचा कोपरा-कोपरा विकला गेला. मुंबईचा खरा सत्यानाश कुणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनीच केला आहे. मुंबई म्हटले की आता लोकांच्या मनात भ्रष्टाचार आणि नकारात्मकता येते आणि याला कारणीभूत उद्धव ठाकरेच आहेत.
ठाकरेंनी हिरव्या रंगाची चादर अंगावर घेतली
अमित साटम म्हणाले, बाण उद्धव ठाकरेंकडून निघून गेला आहे आणि आता त्यांच्या जवळ खान उरलाय. मागील तीन-चार वर्षांत त्यांनी फक्त लांगूलचालनाचे राजकारण केले आहे. त्यांच्या सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसतात, बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्यांचा प्रचार त्यांचे कार्यकर्ते करतात. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा हरवल्या आहेत. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडले आणि हिरव्या रंगाची चादर अंगावर घेतली आहे.
रॅडिकल इस्लामिक विचारांना बळ देण्याचा प्रयत्न
ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे आता त्या पॅटर्नवर चालले आहेत ज्या पद्धतीने काही पाश्चिमात्य देशांमध्ये ‘रॅडिकल इस्लामिक फंडामेंटलिस्ट’ लोकांनी घुसखोरी करून ताबा घेतला. अशा विचारांना बळ देण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. बाहेरच्या लोकांना बनावट ओळखपत्र देऊन मतदार तयार करण्याचे मोठे षड्यंत्र सुरू आहे. बेकायदा लोकांना मुंबईत वसवून शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. रोजच्या रोज आरोप करणे आणि बरळणे एवढेच त्यांच्या हातात उरले आहे. उद्धव ठाकरेंच्या राजकारणामुळे मुंबई शहराला मोठा धोका असल्याचा दावा अमित साटम यांनी केला.
शिवसेना कोणाची, हे जनतेने ठरवले
अमित साटम यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शिवसेनेच्या मालकीच्या वादावरही भूमिका मांडली. ते म्हणाले, शिवसेना खरी कोणाची याचे उत्तर जनतेने वारंवार दिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 44 आमदारांनी त्यांची साथ सोडली आणि शिंदेंकडे वाटचाल केली आणि सत्तेला लाथ मारली. त्या क्षणीच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुणाची? हे त्याचवेळी सिद्ध झाले.
निवडणूक आयोग आणि न्यायालयानेही हेच स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला 57 जागा आणि उद्धव गटाला केवळ 20 जागा मिळाल्या. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना कोणती हे जनतेने एकप्रकारे सिद्ध केले. आमच्यासाठी हा प्रश्न आता संपला आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही एकच शिवसेना आहे. त्याचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असेही अमित साटम म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App