प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊतांनी शरद पवारांचा आरोप रिपीट केला, पण सातारकर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांनी राऊतांचा तिखट प्रतिकार केला. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार पदावर भाजपने निवड केल्यानंतर शरद पवारांनी पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे. आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करू लागले आहेत, असा टोमणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मारला होता. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ उठला होता. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक आहोत, अशी भूमिका त्यावेळी फडणवीसांनी स्पष्टपणे मांडली होती. Udayanraje and shivendraraje targets Sanjay Raut over his casteist remarks
आता तब्बल सात वर्षानंतर संजय राऊत यांनी देखील शरद पवारांचा आरोप रिपीट केला. त्यावर मात्र सातारकर छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांनी राऊतांचा तिखट प्रतिकार केला आहे.
संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या मेळाव्या त उदयनराजे शिवेंद्र राजे आणि शंभूराजे देसाई यांच्यावर शरसंधान साधताना छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत होते. पण आता अनाजीपंत छत्रपतींची नेमणूक करू लागले आहेत. स्वाभिमानाच्या गादीने भाजपशी तडजोड केली. पण हा महाराष्ट्र आहे. स्वाभिमानी महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाला हे कदापि मान्य होणार नाही, असे वक्तव्य केले होते.
या वक्तव्यावरूनच छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांनी राऊत यांच्यावर तिखट शब्दात हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांची विकृत बुद्धी आहेत. कोणताही विषय नसला तरी राजघराण्यावर बोलायचे. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष आहे, त्याची तरी लाज बाळगा, अशा शब्दांत छत्रपती उदयनराजे यांनी संजय राऊत यांचे वाभाडे काढले आहेत. अशाच आशयाची प्रतिक्रिया शिवेंद्रराजे यांनी देखील व्यक्त केली आहे.
छत्रपतींच्या घराण्याबद्दल आदर होता तर संभाजी राजे यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही?, त्या उलट कोल्हापूरच्या संजय पवारांना तिकीट देऊन संभाजीराजेंच्या जखमेवर मीठ चोळले आणि आता छत्रपतींच्या घराण्याबद्दल वाटेल तसे उद्गार काढता, अशा शब्दांमध्ये शिवेंद्रराजे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
एरवी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे सातारच्या स्थानिक राजकारणात एकमेकांचे विरोधात भूमिका बजावतात. पण संजय राऊत यांनी पवारांचा आरोप रिपीट केल्याबरोबर त्यांनी एकजूट दाखवत त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App