साताऱ्याचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी पोवई नाक्यावरील ‘राजधानी सेल्फी पॉईंट’वर चक्क ‘लुंगी’ घालून फोटो सेशन केलं. Udayan Raje tries to hide the failure of five years of work in Lungi, sharp criticism of MLA Shivendra Raje
विशेष प्रतिनिधी
सातारा : पुष्पा चित्रपटाची चर्चा संपुर्ण देशभरात आहे. त्यात आता या सिनेमाने खासदार उदयनराजे भोसले यांनाही भूरळ पाडली.दरम्यान साताऱ्याचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी पोवई नाक्यावरील ‘राजधानी सेल्फी पॉईंट’वर चक्क ‘लुंगी’ घालून फोटो सेशन केलं.त्यानंतर गाडीत बसताना त्यांनी ‘पुष्पा’तील गाण्यावर पुन्हा एकदा कॉलर उडवली.दरम्यान या फोटो शुटवर आता टीका होत आहे. उदयनराजेंच्या या दांसेवर आमदार शिवेंद्रराजे यांनी खोचक टीका केली आहे.
अपयश लुंगीत लपवण्याचा प्रयत्न : शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर जळजळीत टीका @Chh_Udayanraje @SataraMunicipal pic.twitter.com/MaALNv5zDd — Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) January 17, 2022
अपयश लुंगीत लपवण्याचा प्रयत्न : शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर जळजळीत टीका @Chh_Udayanraje @SataraMunicipal pic.twitter.com/MaALNv5zDd
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) January 17, 2022
पाच वर्षांच्या कामाचे अपयश लुंगीमध्ये लपवण्याचा प्रयत्न उदयनराजे करत आहेत.तसेच मी उभारलेल्या कामाच्या प्रेमात उदयनराजे पडले आहेत हे चांगले आहे. उदयनराजेंच्या कामाच्या प्रेमात कोण पडेल अशी काम त्यांच्याकडे नाहीत.अशी खोचक टीका आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर केली.या टीकेला आता खा. उदयनराजे भोसले काय प्रतिउत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App